शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शीख विरोधी दंगलीतील राजीव गांधींच्या भूमिकेचा जगदीश टायटलर यांच्याकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 21:44 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगल भडकली होती. 1984 रोजीच्या या दंगलीत अनेकांना जीव गमवावा लागला होता.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगल भडकली होती. 1984 रोजीच्या या दंगलीत अनेकांना जीव गमवावा लागला होता. ही दंगल काही केल्या थांबण्याचं नाव घेत नव्हती. या दंगलीदरम्यान दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे माझ्यासोबत रस्त्यावर खुलेआम फिरत होते, असं विधान 1984च्या शीख दंगलीचे मुख्य आरोपी आणि माजी खासदार जगदीश टायटलर यांनी केलं आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टायटलर यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. दंगल भडकली त्यावेळी राजीव गांधी माझ्यासोबत कारमध्ये बसले होते. आणि या दंगलीचे दिल्लीत कसे पडसाद उमटतायत, याची चाचपणी केली होती. शीख विरोधी दंगल भडकल्यामुळे राजीव गांधी काहीसे काँग्रेस खासदारांवर नाराज होते. मतदारसंघात शांतता बाळगण्याचे आवाहन करा, असा आदेश त्यांनी काँग्रेस खासदारांना दिला होता, असंही टायटलर म्हणाले आहे. दिल्लीतल्या रस्त्यांवर दंगल कशी घडते, याचा पंतप्रधान राजीव गांधींनी आढावाही घेतला होता.जगदीश टायटलर यांच्या विधानानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. टायटलर यांच्या विधानानुसार राजीव गांधी हे 1984मध्ये दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत होते. टायटलर यांनी केलेल्या विधानाचा अर्थ तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे शिखांच्या हत्या कशा प्रकारे होतात, यावर लक्ष ठेवून होते, असाही निघत असल्याचं सुखबीर सिंह बादल यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही बादल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.जगदीश टायटलर यांचं विधान निराधार असल्याचं म्हणत काँग्रेसनं त्यांच्यावर पलटवार केला आहे. 1984च्या शीख दंगलीत असे काहीही घडले नसल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. इंदिराजींच्या हत्येनंतर शीख विरोधी दंगल उसळली होती. या दंगलीच्या चौकशीसाठी नानावटी आयोग स्थापण्यात आला होता. या आयोगानेही जगदीश टायटलर यांना हिंसाचाराबाबत दोषी ठरवले होते, असंही अमरिंदर सिंह म्हणाले आहेत. 31 ऑक्टोबर 1984 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली होती. इंदिरा गांधींच्या  हत्येनंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शीख विरोधी दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत हजारो लोकांना स्वतःच्या प्राणांना मुकावे लागले आहे. तर या दंगलीचे दिल्लीत सर्वाधिक बळी ठरले होते.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीRajiv Gandhiराजीव गांधी