शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जवानांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढणार, CDS बिपीन रावतांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 13:05 IST

'जवानांची नियुक्ती वयाच्या 18 व्या वर्षी केली जाते. ते लष्करातून वयाच्या 37-38 व्या वर्षी निवृत्त होतात.'

नवी दिल्ली : भारतीय लष्करातील जवानांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्यासंदर्भात ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपीन रावत यांनी मोठे विधान केले आहे. जवानांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे करण्यासाठी लष्कराच्या तिन्ही दलांकडून संशोधन करण्यात येत असल्याचे बिपीन रावत यांनी सांगितले. 

वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, लष्कराचे अधिकारी वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. या वयापर्यंत त्यांची मुलं सेटल होतात किंवा सेटल होण्याच्या मार्गावर असतात. त्यामुळे ही समस्या अधिकाऱ्यांचीच नाही तर जवानांची आहे. जवानांची नियुक्ती वयाच्या 18 व्या वर्षी केली जाते. ते लष्करातून वयाच्या 37-38 व्या वर्षी निवृत्त होतात. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागते, असे बिपीन रावत यांनी सांगितले.

याचबरोबर, लष्कराच्या एक तृतीयांश जवानांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे असले पाहिजे. सध्या जवान वयाच्या 38 व्या वर्षी निवृत्त होतात. 17 वर्षांच्या सेवेनंतर आम्ही जवानांना सरासरी 30-32 वर्षापर्यंत पेन्शन देतो. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून 38 वर्षापर्यंत देशसेवा का करून घेऊ शकत नाही आणि 20 वर्षांपर्यंत पेन्शन का देऊ शकत नाही. आम्ही हा ट्रेंड बदलण्याच्या मार्गावर आहेत, असेही बिपीन रावत म्हणाले.

याशिवाय, सरकारने डिफेंस बजेटमध्ये 3.18 लाख कोटी वाढवून 2020-21मध्ये 3.37 लाख कोटी केले आहे. यामुळे लष्काराचे आधुनिकीकरण केले जाऊ शकते. आर्मी मेडिकल कॉर्प (AMC) चा विचार केल्यास मला वाटते की, 100 टक्के एएमसीचे जवान 58 वर्षांपर्यंत सेवा देऊ शकतात, असेही बिपीन रावत यांनी सांगितले.  

जनरल रावत पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’बिपिन रावत यांची ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नियुक्ती करण्यात आली. लष्करप्रमुखपदाची कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. लष्कर, हवाई दल व नौदलात समन्वय साधण्यासाठी जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी होती. आतापर्यंत तिन्ही दलांच्या प्रमुखांतील ज्येष्ठ सैन्याधिकाऱ्यास ते पद दिले जायचे. याऐवजी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पद निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. याशिवाय संरक्षण मंत्रालयात मिलिटरी अ‍ॅफेअर्स विभागही स्थापन केला आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ संरक्षणमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील. लष्करप्रमुखाचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे आहे. निवृत्त लष्करप्रमुखास ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नेमल्यास त्यास तीन वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत कार्यकाळ मिळेल.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBipin Rawatबिपीन रावत