शहरं
Join us  
Trending Stories
1
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
2
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
3
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
5
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
6
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
7
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
8
स्मिता पाटील यांच्यासोबतच्या तुलनेवर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया, म्हणाली, "बाईला संघर्ष आजही..."
9
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
10
मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही राधिका आपटे? म्हणाली, "मला काही काळापासून..."
11
मुलाने कपाटातून आईचा महागडा नेकलेस चोरला, तोडून शाळेतील विद्यार्थिनींना वाटला, त्यानंतर...
12
IND vs SA T20I : संजूच्या जागी गिल का? सलामी संदर्भात कॅप्टन सूर्यानं स्पष्टीकरण दिलं, पण...
13
Jara Hatke: रात्री झोपताना एक पाय ब्लँकेटमधून बाहेर काढण्याची सवय आहे? मग 'हे' वाचाच!
14
IND vs SA: विराटची शतकं, रोहितची फटकेबाजी, संघाने मालिकाही जिंकली; पण आता आली वाईट बातमी
15
बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण
16
चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा
17
Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
18
"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव
19
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
20
हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:43 IST

एस विजयन यांनी आपल्या मुलींवर नाराज होऊन त्यांची तब्बल ४ कोटींची संपत्ती मंदिराला दान केल्याची घटना समोर आली आहे.

तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यात ६५ वर्षीय निवृत्त सैनिक एस विजयन यांनी आपल्या मुलींवर नाराज होऊन त्यांची तब्बल ४ कोटींची संपत्ती मंदिराला दान केल्याची घटना समोर आली आहे. एस विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुली दैनंदिन गरजांसाठी त्यांना टोमणे मारत असत आणि संपत्तीवरून भांडत असत. मात्र आता कुटुंब ही संपत्ती परत मिळविण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधत आहे.

एस विजयन काही दिवसांपूर्वी अरुलमिगू रेणुगंबल अम्मन मंदिरात गेले आणि त्यांच्या संपत्तीची कागदपत्र दान केली. यामध्ये ३ कोटींची मालमत्ता आणि १ कोटी रुपयांची आणखी एक मालमत्तेचा समावेश होता. मंदिराच्या अधिकाऱ्यांना मंदिराच्या दानपेटीची तपासणी करताना याबाबत माहिती मिळाली.

मंदिराच्या दानपेटीत सापडली संपत्तीची कागदपत्र

मंदिराच्या दानपेट्या दर दोन महिन्यांनी उघडल्या जातात, ज्यामध्ये भक्तांनी दान केलेले पैसे मोजले जातात. यावेळी जेव्हा दानपेटी उघडण्यात आली तेव्हा नाणी आणि नोटांमध्ये संपत्तीची कागदपत्र सापडली. यामध्ये जमिनीची कागदपत्र आणि मंदिराजवळील एक घराचे कागदपत्र होते. यासोबतच एक चिठ्ठी देखील सापडली.

"दानपेटीत कागदपत्र टाकल्याने संपत्ती मंदिराची होत नाही"

मंदिराचे कार्यकारी अधिकारी एम. सिलम्बरासन यांनी द हिंदूला दिलेल्या माहितीनुसार, येथे पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, दानपेटीत कागदपत्र टाकल्याने संपत्ती मंदिराची होत नाही. यासाठी देणगीदाराला कायदेशीररित्या देणगीची नोंदणी करावी लागेल.

"मी माझा निर्णय मागे घेणार नाही"

विजयन म्हणाले की, "मी माझी संपत्ती मंदिराच्या नावावर कायदेशीररित्या नोंदणीकृत करेन. मंदिर अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मी हे करेन. मी माझा निर्णय मागे घेणार नाही. माझ्या मुलींनी माझ्या दैनंदिन गरजांसाठीही मला टोमणे मारले."

मुलींनी दिली नाही साथ

एस विजयन हे देवाचे भक्त आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या मुलींनी त्यांना साथ दिली नाही. तसेच त्यांच्यावर संपत्ती बळकावण्यासाठी दबाव आणला आहे.

कुटुंबाला मोठा धक्का विजयन यांच्या निर्णयाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता त्यांचं कुटुंब ही संपत्ती परत मिळवण्यासाठी कायदेशीर मदत घेत आहे. पण विजयन हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूTempleमंदिर