शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कमी पावसामुळे किरकोळ महागाई वाढणार; कांदा, बटाटा व टोमॅटोचे दर वधारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:54 IST

कमी पावसामुळे कांदा, बटाटा व टोमॅटो या सर्वाधिक मागणीच्या तीन भाज्यांचे दर वधारू लागले आहेत.

मुंबई : कमी पावसामुळे कांदा, बटाटा व टोमॅटो या सर्वाधिक मागणीच्या तीन भाज्यांचे दर वधारू लागले आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीपर्यंत (जानेवारी-मार्च २०१९) किरकोळ महागाई दरात वाढीची शक्यता आहे. हा दर ४ टक्क्यांच्या वर जाऊ शकतो, असा स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाचा अंदाज आहे.आॅगस्ट महिन्यातील महागाईचा दर जुलैच्या ४.१७ टक्क्यांवरून ३.६९ पर्यंत घसरला, पण खरिपाच्या पिकांची स्थिती कमी पावसामुळे आॅगस्टनंतर बदलली. सप्टेंबर महिन्यात घाऊक बाजारात कांदा ९ टक्के महाग झाला आहे. नोव्हेंबर ते मे या काळात कांद्याची मागणीमोठी असते. यामुळे कांद्याचे दर किमान २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. सध्या २ टक्के महाग झालेला टोमॅटोसुद्धा ५ ते १० टक्के व अडीच टक्के महाग असलेले बटाट्याचे दरही १० टक्क्यांपर्यंत वधारू शकतात. यातूनच महागाई दर वाढेल, असा अंदाज बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी वर्तविला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात धान्यांची आवक यंदा वाढलेली आहे, पण भारतीय बाजार हा देशांतर्गत पिकांवर अवलंबून असतो. कमी पावसामुळे देशांतर्गत भाजीपाला व धान्यांची उपलब्धता कमी राहण्याची शक्यता आहे.कृषी निर्यात धोरण आवश्यककमी पावसामुळे सध्या देशात निर्माण झालेली स्थिती पाहता, केंद्राने कृषी निर्यात धोरण लवकरात लवकर तयार करण्याची गरज आहे. हे धोरण लवकर तयार झाल्यास महागाईच्या दरावर त्याचा निश्चितच परिणाम दिसेल.

टॅग्स :InflationमहागाईSBIएसबीआय