शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Supreme Court : मेडिकल प्रवेश परीक्षेचा निकाल होणार जाहीर, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 05:29 IST

Supreme Court : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

नवी दिल्ली : ‘नीट २०२१’ चा निकाल या आठवडाअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली आहे. १६ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलीहोती. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या आदेशानुसार आता एनटीए मेडिकल प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते. न्या. एल. नागेश्वर राव, संजीव खन्ना आणि बी. आर. गवई यांच्या पीठाने हे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशात महाराष्ट्रातील त्या दोन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करण्यास सांगण्यात आले होते, त्यांच्या टेस्ट बुकलेट आणि ओएमआर शीटस मिसळले गेले होते.

‘त्या’ विद्यार्थ्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय एनटीएकडून सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, दिवाळीच्या सुटीनंतर या दोन विद्यार्थ्यांच्या याचिकेवर निर्णय घेण्यात येईल. तथापि, या घडामोडींसाठी १६ लाख विद्यार्थ्यांच्या निकालावर स्थगिती देता येणार नाही. उच्च न्यायालयाला हे आढळून आले होते की, वैष्णवी भोपाली आणि अभिषेक या दोन विद्यार्थ्यांचे टेस्ट बुकलेट आणि ओएमआर शीटस टेस्ट सुरु होण्यापूर्वी मिसळले गेले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMedicalवैद्यकीय