शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाभियोग प्रक्रियेत सहभागी खासदारांच्या वकिलीवर बंधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 04:38 IST

सर्वोच्च तसेच हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधातील महाभियोगाच्या कार्यवाहीत सहभागी होणाऱ्या खासदार आणि आमदारांना त्या न्यायाधीशाच्या न्यायालयात वकिली करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) घेतला आहे. व्यवसायाने वकील असलेल्या खासदार आणि आमदारांना खासगी प्रॅक्टिस करण्याची परवानगी देतानाच बीसीआयने महाभियोगाच्या प्रक्रियेत सहभागी होणा-या खासदार-आमदार वकिलांवर बंधन घातले आहे.

नवी दिल्ली  - सर्वोच्च तसेच हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधातील महाभियोगाच्या कार्यवाहीत सहभागी होणाऱ्या खासदार आणि आमदारांना त्या न्यायाधीशाच्या न्यायालयात वकिली करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) घेतला आहे. व्यवसायाने वकील असलेल्या खासदार आणि आमदारांना खासगी प्रॅक्टिस करण्याची परवानगी देतानाच बीसीआयने महाभियोगाच्या प्रक्रियेत सहभागी होणा-या खासदार-आमदार वकिलांवर बंधन घातले आहे.बीसीआयचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातील माहिती दिली. राज्यसभेमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे खासदार सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीआयने घेतलेलाहा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.अधिकारांचा दुरुपयोग टाळण्यासाठी त्याचप्रमाणे वकिलांच्या विशेषाधिकारांचे संरक्षण करण्याकरिता हा निर्णय घेतला असल्याची भूमिका बीसीआयचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी मांडली. हा निर्णय घेण्यापूर्वी बीसीआयच्या आमसभेमध्ये आमदार-खासदार असलेल्या वकिलांना खासगी प्रॅक्टिस करु देण्यासंदर्भात उपसमितीच्या अहवालातील शिफारशींवर विचार केला गेला. या अहवालात वकिलांच्या खासगी प्रॅक्टिसला कोणतीही हरकत घेण्यात आली नाही, मात्र महाभियोगामधील सहभागासंदर्भातील अट घातली गेली.अश्विनीकुमार उपाध्याय यांची याचिकादिल्ली प्रदेश भाजपचे प्रवक्ते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात आमदार आणि खासदार असलेल्या वकिलांना खासगी प्रॅक्टिस करण्यास मनाई करावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. १२ मार्च रोजी या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बीसीआयला त्यांची बाजू मांडण्यास सांगितले होते.बीसीआयने त्यानंतरच हा निर्णय घेतला असून त्याची माहिती सर्वोच्च न्यायालयालाही देण्यात येईल. कपिल सिब्बल, विवेक तनखा आणि अभिषेक मनू सिंघवी या बीसीआयच्या तीन वरिष्ठ सदस्यांच्या शिफारशींनंतरच आमदार-खासदार वकिलांच्या खासगी प्रॅक्टिससंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनन कुमार मिश्रा यांनी दिली.हे तिघेही जण राज्यसभेचे खासदार आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारत