शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निश्चिंत राहा! तुमचा मोबाईल नंबर 10 अंकीच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:05 IST

M2M मोबाईल क्रमांक 13 अंकी करण्यासाठीच्या पोर्ट प्रक्रियेला 1 ऑक्टोबर 2018 पासून सुरुवात होणार आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये मोबाईलचा क्रमांक 13 अंकी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे अनेकजण आपला सध्याचा मोबाईल क्रमांक बदलल्यावर कसे होणार, या चिंतेत पडले होते. याविषयी स्पष्ट माहिती मिळत नसल्यामुळे काहीसा गोंधळही निर्माण झाला होता. मात्र, आता याबाबतचा गोंधळ दूर झाला असून सामान्य ग्राहकांचा मोबाईल क्रमांक 10 अंकी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दूरसंचार मंत्रालयाकडून काही दिवसांपूर्वी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये M2M (मशिन टू मशिन) मोबाईल नंबर 10 वरून 13 अंकी होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये आपल्या मोबाईलचा नंबरही बदलणार असा समाज पसरला होता. परंतु, सामान्य मोबाईल क्रमांक आणि M2M नंबर्समध्ये फरक असतो.  M2M मोबाईल नंबर हे स्वाईप मशिन्स, कार, वीजेची मीटर्स यांसारख्या उपकरणांसाठी वापरले जातात. त्यामुळे हा बदल सामान्य ग्राहकांसाठी नसेल असे भारती एअरटेल आणि जिओच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, M2M मोबाईल क्रमांक 13 अंकी करण्यासाठीच्या पोर्ट प्रक्रियेला 1 ऑक्टोबर 2018 पासून सुरुवात होणार आहे. 31 डिसेंबर 2018 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मशिन टू मशिन नेटवर्क (M2M) असणाऱ्या ग्राहकांना 1 जुलै 2018 पासून 13 अंकी क्रमांकाचा वापर करणे अनिवार्य असेल. 

टॅग्स :Mobileमोबाइल