शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांचा आदर करणे पतीपत्नीची जबाबदारी; हायकोर्टाने घटस्फोट फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 06:16 IST

पत्नीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप पतीने केला आहे.  त्यामुळे त्याने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(१)(ए) अंतर्गत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. 

कोलकाता : वैवाहिक आयुष्यात लहान मोठ्या अडचणी येतील त्या सोडविणे, एकमेकांच्या निर्णयांचा आदर करणे आणि घरात उत्तम वातावरण राहील यासाठी प्रयत्न करणे हे पतीपत्नीची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगून कोलकाता हायकोर्टाने घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली.

न्यायमूर्ती हरीश टंडन आणि न्यायमूर्ती मधुरेश प्रसाद यांच्या खंडपीठाने सांगितले की, दोघांनीही एकमेकांच्या निर्णयाचा परस्पर आदर केला पाहिजे. हीच समाजाची ओळख आहे, असे कोर्टाने म्हटले.

पतीचा आरोप काय? पत्नीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप पतीने केला आहे.  त्यामुळे त्याने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(१)(ए) अंतर्गत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. पत्नी सतत अपमान करते, तिने अनेकवेळा मारहाणही केली. ती अतिशय रागीट आहे. तिने पायऱ्यांवरून खाली फेकण्याचा प्रयत्न केला आणि आईला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पतीने केला होता.

पत्नीचा आरोप काय? सासू नेहमीच तिच्याशी क्रूरपणे वागत असे. तिला फर्टिलिटी टेस्टही करण्यास भाग पाडण्यात आले. असे असले तरीही मी पतीसोबत रहायला तयार आहे, असे पत्नीने म्हटले आहे.

कोर्टाने काय म्हटले? राज्यघटनेनेही स्त्री-पुरुष समानतेला मान्यता दिली आहे. त्यामुळे पतीला पत्नीपेक्षा वरचा दर्जा देणे चुकीचे आहे. कोर्टाने म्हटले की, कायद्यात क्रूरतेची व्याख्या नसली तरी घटस्फोट घेण्याचे हे एक कारण आहे. यात केवळ शारीरिकच नाही तर, मानसिक क्रूरतेचाही समावेश आहे. सुखी वैवाहिक जीवनात पत्नी चांगले वातावरण निर्माण करते आणि पती परिस्थिती बदलत असतो ही जुनी धारणा हळूहळू संपत गेली आहे, असे म्हणत कोर्टाने घटस्फोट फेटळात अपील करण्यास परवानगी दिली.

टॅग्स :Courtन्यायालयDivorceघटस्फोट