शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनच्या सुरळीत वाहतुकीची स्थान‍िक प्रशासनावर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 04:27 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश, पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उद्भवलेल्या ऑक्स‍िजन संकटामध्ये महाराष्ट्रासह २० राज्यांना पूर्ण क्षमतेने पुरवठा करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सर्व संबंधित मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी बैठक घेणार असून, कोरोनाच्या स्थितीचा आढावा त्यात घेण्यात येणार आहे

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज उच्चांकी वाढ नोंदविण्यात येत आहे. महाराष्ट्रासह २० राज्यांमध्ये ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणत वाढली आहे. ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. याची गंभीर दखल घेऊन अनेक राज्यांच्या उच्च न्यायालयांनी केंद्र सरकरवर ताशेरे ओढले आहेत. अशास्थितीत पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना केवळ उत्पादन वाढविण्यासोबतच पुरवठादेखील गतिमान करण्याचे निर्देश दिले. या राज्यांना दररोज ६७८५ मेट्रिक टन एवढ्या मागणीच्या तुलनेत ६८२२ मेट्रिक टन पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी थोडा वेळ लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलाद प्रकल्प तसेच विविध खासगी कंपन्यांकडून ऑक्सिजनचे उत्पादन होत असल्याने दररोजची उपलब्धता ३३०० मेट्रिक टनाने वाढली आहे. या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने तात्काळ सर्व राज्यांना सूचना पाठविल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पुरवठा करण्यात यावा. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्यात यावे. तसेच टँकर्सची कुठेही अडवणूक होणार नाही, याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात यावी, असे निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत.

रिकामे टँकर्स एअरलिफ्टऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यात आली आहे. मात्र, रेल्वेला एक फेरी पूर्ण करण्यासाठी चार-पाच दिवस लागतात. त्यामुळे गतिमान पुरवठ्यासाठी मुंबईतून रिकामे टँकर्स एअरलिफ्ट करून पाठविण्यात आले आहेत. याशिवाय १६२ ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होतील, अशी माहितीही पंतप्रधानांना देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या