शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी पाठवलेल्या पत्राला प्रणवदांच्या कन्येने दिले असे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 00:04 IST

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक भावपूर्ण पत्र लिहून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला होता. त्यानंतर प्रणवदांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले होते. आता प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही या पत्राला उत्तर दिले आहे. 

नवी दिल्ली, दि. 3 -  भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक भावपूर्ण पत्र लिहून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला होता. त्यानंतर प्रणवदांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले होते. आता प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही या पत्राला उत्तर दिले आहे. शर्मिष्ठा यांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले आहेत. त्या ट्विटमध्ये म्हणतात, एक मुलगी म्हणून या पत्रासाठी मी तुमचे आभार मानते. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून मी तुमच्या सरकारच्या लोकविरोधी धोरणांवर नेहमीच टीका करत राहीन. आणि हीच भारतीय लोकशाहीची सुंदरता आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पत्राच्या स्वरूपात खास भेट दिली होती. याआधी प्रणव मुखर्जी माझ्या वडिलांसारखे आहेत, असं म्हणत मोदींना प्रणव मुखर्जी यांचा सन्मान केला होता. आता मोदींनी प्रणव मुखर्जी यांना एक पत्र लिहिलं आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींनी दिलेलं पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं पत्र मनाला भावणारं आहे, असं प्रणव मुखर्जी यांनी म्हंटलं. सुरूवातीला नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये नवीन असताना प्रणव मुखर्जी यांनी कसं मार्गदर्शन केलं, याचा उल्लेख मोदींनी त्यांच्या पत्रात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं पत्र शेअर करताना प्रणव मुखर्जी म्हणाले,'राष्ट्रपती कार्यालयातील माझ्या शेवटच्या दिवशी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र दिलं आहे. हे पत्र माझ्या मनालं भावलं आहे. आता ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात प्रणव मुखर्जी यांना प्रेरणा स्त्रोत म्हंटलं आहे. मोदींनी पत्राल लिहिलं, तुम्ही आता एका नव्या पर्वाची सुरूवात करत आहात. राष्ट्रपती असताना तुम्ही या देशाला खूप प्रेरणा दिली आहे. तीन वर्षापूर्वी नवी दिल्लीत मी नवखा होतो. इथे काम करणं माझ्यासाठी एक आव्हान होतं. पण या काळात तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे मला मार्गदर्शन केलं आणि मदत केली. तुमच्याकडे मोठा राजकीय, आर्थिक, वैश्विक अनुभव आहे ज्याचा फायदा मला आणि माझ्या सरकारला वेळोवेळी झाला आहे. आपण दोघांचा राजकिय प्रवास वेगळा, आपले विचारही वेगळे होते. मी फक्त एका राज्यातून काम करून आलो होतो. तरीही तुमच्या अनुभवाच्या मदतीने आपण एकत्र काम केलं.  तुम्ही माझ्यासाठी नेहमी स्नेही आणि माझी काळजी घेणारे होतात. माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तुम्ही केलेला एक फोन  मला नवी ऊर्जा द्यायचा. माझ्या लांबलचक चालणाऱ्या बैठका आणि कॅम्पन्सनी भरलेल्या दिवसांमध्ये तुमचा येणार एक फोन माझ्यात नवा उत्साह निर्माण करायचा. नवा उत्साह मिळविण्यासाठी तुमचा फक्त एक फोन पुरेसा असायचा.  संसदेत निरोप समारंभाच्या वेळी प्रणव मुखर्जींनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्यासाठी मोदींनी प्रणव मुखर्जी यांचे पत्रातून आभार मानले आहेत.