शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी हत्तिणीच्या अकस्मात मृत्यूने हळहळले पुडुचेरीवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 09:41 IST

हृदयविकाराच्या झटक्याने अचानक कोसळली रस्त्यावर

पुडुचेरी : पुडुचेरी येथील श्री मनकुला विनयगर या प्रसिद्ध मंदिरातील लक्ष्मी या हत्तिणीला नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला नेले असताना बुधवारी अचानक रस्त्यात कोसळून तिचा मृत्यू झाला. ती  ३२ वर्षांची होती. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञाने म्हटले आहे. लक्ष्मी ही हत्तीण त्या मंदिराचे अभिमानस्थळ होतीच; पण अनेकांची ती लाडकी होती. तिच्या निधनाने भाविकांवर शोककळा पसरली आहे.

लक्ष्मी हत्तिणीची लोकांना इतकी ममता वाटायची की तिच्या मृत्यूनंतर पुडुचेरीचे नायब राज्यपाल तामिलसाई सुंदरराजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली. बुधवारी सकाळी लक्ष्मी पुडुचेरीतून  फेरफटका मारत असताना एका महाविद्यालयाच्या इमारतीजवळ अचानक रस्त्यावर कोसळली व तिचा मृत्यू झाला. या बातमीने सारे भाविक हळहळले. लक्ष्मी हत्तिणीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातून झपाट्याने सर्वत्र पसरली. पुडुचेरीतील अनेक भाविक तत्काळ घटनास्थळी गेले. तिथे त्यांनी लक्ष्मीच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण केले. तिच्या मृत्यूच्या कारणांबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. 

२०२० या वर्षाच्या प्रारंभी कोरोना साथीच्या काळात लक्ष्मी या हत्तिणीला श्री मनकुला विनयगर या मंदिरातून काही महिने दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. मात्र, भाविकांनी पुन्हा प्रयत्न करून लक्ष्मीला या मंदिरात आणले होते. लक्ष्मी हत्तीण या मंदिराचे वैभव असल्याची भाविकांची भावना होती. 

अंतिम दर्शन घेताना भाविक झाले भावुकलक्ष्मी हत्तिणीच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक सामील झाले होते. अनेक जण तिचे अंत्यदर्शन घेताना खूप भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळत होते. लक्ष्मीची श्री मनकुला विनयगर मंदिरात येणारे भाविक मनोभावे पूजा करीत असत. लक्ष्मी हत्तीण ही देवता आहे, अशीही भाविकांची श्रद्धा होती.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू