शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! 'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार, म्हणाले 'कोव्हिशील्ड'च हवी!

By मोरेश्वर येरम | Updated: January 16, 2021 14:22 IST

राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हिशील्ड लशीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देभारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सीन'वर डॉक्टरांना शंका?निवासी डॉक्टर म्हणाले आम्हाला कोव्हिशील्ड द्या, कोव्हॅक्सीन नको!राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांचा पत्राने खळबळ

नवी दिल्लीदेशात आजपासून कोरोना लशीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पण दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालयात लशीकरणाची मोहीम सुरू होण्याआधीच मोठी घडामोड समोर आली आहे. रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी 'कोव्हॅक्सीन' ऐवजी 'कोव्हिशील्ड' लस टोचली जावी अशी मागणी करणारं पत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहीलं आहे. 

दरम्यान, याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. डॉक्टरांनी लिहिलेल्या पत्रानुसार, राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हिशील्ड लशीची मागणी केली आहे. "रुग्णालयात आजपासून कोरोना लशीकरणाची मोहिम सुरु करण्यात येत असल्याचं आम्हाला कळलं. पण यात भारत बायोटेकने विकसीत केलेल्या कोव्हॅक्सीनची लस निवासी डॉक्टरांना देण्यात येणार आहे. पण कोव्हॅक्सीनच्या चाचण्या पूर्ण न झाल्यामुळे डॉक्टरांना या लशीबाबत काही शंका आहेत. याशिवाय यामुळे लशीकरणाचा मुख्य उद्देश देखील साध्य होणार नाही. त्यामुळे कोव्हॅक्सीन ऐवजी कोव्हिशील्ड लस डॉक्टरांना दिली जावी", असं डॉक्टरांनी पत्रात नमूद केलं आहे. 

एम्सच्या संचालकांनी 'कोव्हॅक्सीन' बाबत केलं होतं मोठं विधानदिल्लीत आज कोरोना लशीकरणाच्या मोहीमेला सुरुवात झाली. कोरोना महामारीच्या काळात कोविड योद्धा म्हणून पहिल्या फळीत राहून जीवाची बाजी लावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लस देण्यात येत आहे. भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात आली. पण त्याआधी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोव्हॅक्सीनचा उल्लेख 'बॅकअप' असा केला होता. पण गुलेरिया यांच्या या विधानावर भारत बायोटेकच्या संचालकांनी नाराजी व्यक्त केली होती. 

एम्सच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनीही कोव्हॅक्सीनला नाकारलंकोव्हॅक्सीनच्या चाचणीमध्येही एम्सच्या कर्मचाऱ्यांनी उत्साह दाखवला नव्हता. कोव्हॅक्सीनच्या चाचणीवेळी एम्समध्ये स्वयंसेवकही खूप कमी होते. चाचणीत सहभागी होण्यासाठी मोबाइल मेसेज पाठविण्याची वेळ आली होती. पण आता तीच लस एम्समध्ये कर्मचाऱ्यांना टोचण्यासाठी पाठविण्यात आली आहे. दरम्यान, एम्समध्ये कोव्हॅक्सीनची चाचणी झालेली असून ती सर्व पातळ्यांवर सुरक्षित असल्याचं याआधीच जाहीरही करण्यात आलं आहे.   

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्लीCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या