शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये फेरबदल सुरू; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 09:55 IST

आजच भाजपने पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश व झारखंडच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली.

- संजय शर्मानवी दिल्ली : मोदी मंत्री परिषदेच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष हटवून नवीन नियुक्त्या केल्या आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळातील फेरबदलापूर्वी भाजप संघटनेत आणखीही अनेक नियुक्त्या होणार आहेत. मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच भाजपमधील फेरबदलाची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

आजच भाजपने पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश व झारखंडच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली. यात सर्वांत आश्चर्यकारक नाव केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांचे आहे. बंदी संजय यांच्या जागी त्यांना तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष केले आहे. पंजाबमध्ये अश्विनी शर्मा यांना हटवून भाजपने मागील वर्षीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये सहभागी झालेले सुनील जाखड यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे.  भाजपने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार यांना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केले आहे. लवकरच आणखीही काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष हटवले जाऊ शकतात. 

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेला वेगकेंद्रीय मंत्रिपरिषदेच्या बैठकीनंतरच मोदी सरकारच्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावरील हास्य लोपले आहे. कोणाचे मंत्रिपद जाईल आणि कोणाचे राहील, हे कोणालाही माहिती नाही.केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर बंदी संजय यांचे नाव मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.अशाच प्रकारे राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आठ महिने आधीच राजीनामा दिल्याने त्यांचे नावही केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत चर्चेत आले आहे. नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हर्ष चौहान यांना मंत्री केले जाऊ शकते. 

भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणिसांची होणार नियुक्तीपुरंदेश्वरी यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रीय सरचिटणिसांची नियुक्ती होणार आहे. याचप्रमाणे आणखी दोन राष्ट्रीय सरचिटणिसांना प्रदेशाध्यक्ष केले जाण्याची चर्चा आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, दोन केंद्रीय मंत्र्यांनाही भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस केले जाऊ शकते. 

टॅग्स :BJPभाजपा