शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एससी-एसटींसाठी बढत्यांमध्ये आरक्षण हवे; सर्वोच्च न्यायालयात धरला आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 05:45 IST

सरकारी नोकऱ्यांमधील बढत्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचा-यांसाठी २२.५ टक्के आरक्षण असायलाच हवे, अशी आग्रही भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी मांडली.

नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांमधील बढत्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचा-यांसाठी २२.५ टक्के आरक्षण असायलाच हवे, अशी आग्रही भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी मांडली. हा वर्ग हजारो वर्षांपासून प्रचंड अन्याय, अत्याचार सहन करत असून, त्यामुळे त्याची प्रगतीही खुंटली आहे. त्यासाठीही त्यांना पदोन्नतीतही आरक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केले.बढत्यांमध्ये क्रिमिलेयरना आरक्षण ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली नागराज खटल्यात दिलेल्या निकालामुळे अडथळे येत आहेत. अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी सांगितले की, बढत्यांमध्ये आरक्षण ठेवणे योग्य की अयोग्य, यावर कोणतीही टिप्पणी करणार नाही. मात्र, नागराज खटल्याच्या निकालाचा फेरविचार होणे आवश्यक आहे, अशी केंद्राची भूमिका आहे.नागराज खटल्याच्या निकालाला आव्हान देण्यात आल्यानंतर हा खटला गेल्या वर्षी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला होता. सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे या प्रकरणाच्या सुनावणीस शुक्रवारी प्रारंभ झाला. या खंडपीठामध्ये न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. संजय किशन कौल व न्या. इंदू मल्होत्रा यांचाही समावेश आहे.पुढील सुनावणी १६ आॅगस्टलाबढत्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातींचे प्रतिनिधीत्व कमी आहे हे आकडेवारीतून सिद्ध झाले तरच त्यांना आरक्षण देण्याचा विचार करता येईल, असे नागराज खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.त्यावर अ‍ॅडव्होकेट जनरल वेणुगोपाल म्हणाले की,अनुसूचित जाती-जमातीच्या आधारावर एखाद्याला सेवेत घेतल्यानंतर पुन्हा बढतीसाठी त्यांची आकडेवारी गोळा करण्याचे काहीच प्रयोजन नाही.सरकारी नोक-यांमधील बढत्यांमध्ये अनुसूचित जातींना १५ टक्के व अनूसुचित जमातींना ७.५ टक्के असे एकूण २२.५ टक्के आरक्षण ठेवावे अशी केंद्राची भूमिका आहे, असेही ते म्हणाले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ आॅगस्ट रोजी होणार आहे.

टॅग्स :reservationआरक्षण