शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

देशातील सर्वोच्च पुरस्कारांची केंद्र सरकारकडून घोषणा; महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 20:33 IST

प्रजासत्ताक दिनापूर्वी, केंद्र सरकारने शनिवारी पद्म पुरस्कार मिळालेल्यांची नावे जाहीर केली आहेत.

Padma awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजाच्या जनहितासाठी काम करणाऱ्या नायक आणि वीरांना देशाच्या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी ३० नावांची घोषणा केली आहे. भीमसिंग भावेश, डॉ.नीरजा भाटला, ॲथलीट हरविंदर सिंग यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. तर होमिओपॅथी चिकिस्तक असलेल्या डॉ. विलास डांगरे आणि वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

गोवा स्वातंत्र्य चळवळीच्या सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, मध्य प्रदेशातील उद्योजिका शैली होळकर, मराठी लेखक मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना पद्मश्री देण्यात येणार आहे. दिल्लीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीरजा भाटला, सामाजिक कार्यकर्ते भीमसिंह भावेश, पुद्दुचेरी येथील थविल वादक  पी. दत्चनमूर्ती, पश्चिम बंगालमधील धक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योग शिक्षिका शेखा एजे अल सबा, उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यूग आणि कॉलीन गँटझर, नागालँडमधील फळ उत्पादक एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, कादंबरीकार जगदीश जोशीला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातून तिघांचा सन्मान

महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले आहे. गेल्या ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना बरे केले आहे. तसेच पर्यावरण आणि वनसंवर्धनात काम करणाऱ्या पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अरण्यऋषी म्हणून ओळख असलेल्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची  यादी:

- एल हँगथिंग (नागालँड)

- हरिमन शर्मा (हिमाचल प्रदेश)

- जुमदे योमगम गमलिन (अरुणाचल प्रदेश)

- जोयनाचरण बाथरी (आसाम)

- नरेन गुरुंग (सिक्कीम)

- डॉ. विलास डांगरे (महाराष्ट्र)

- शेखा एजे अल सबाह (कुवैत)

- निर्मला देवी (बिहार)

- भीमसिंग भावेश (बिहार)

- राधा बहिन भट्ट (उत्तराखंड)

- सुरेश सोनी (गुजरात)

- पंडीराम मांडवी (छत्तीसगड)

- जोनास मॅसेट (ब्राझील)

- जगदीश जोशीला (मध्य प्रदेश)

- हरविंदर सिंग (हरियाणा)

- भैरूसिंग चौहान (मध्य प्रदेश)

- व्यंकप्पा अंबाजी सुगतेकर (कर्नाटक)

- पी दत्तनमूर्ती (पुडुचेरी)

- लिबिया लोबो सरदेसाई (गोवा)

- गोकुल चंद्र दास (पश्चिम बंगाल)

- ह्यू गँट्झर (उत्तराखंड)

- कॉलीन गँटझर (उत्तराखंड)

- डॉ. नीरजा भाटला (दिल्ली)

- सायली होळकर (मध्य प्रदेश)

- मारुती भुजंगराव चितमपल्ली (महाराष्ट्र)

परदेशी नागरिकांचाही सन्मान

शेखा एजे अल सबाः कुवेतच्या योगसाधक अल सबा यांना योग चिकित्सामध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांनी त्यांच्या देशातील पहिला परवानाधारक योग स्टुडिओ स्थापन केला. याद्वारे अल सबाहने आखाती देशांमध्ये आधुनिक पद्धतींसह योगास प्रोत्साहन दिले आणि शम्स यूथ योगाची सह-स्थापना केली.

जोनास मॅसेट: ब्राझिलियन मेकॅनिकल अभियंता हिंदू आध्यात्मिक नेता बनलेले जोनास यांनी भारतीय अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा प्रचार केला. जागतिक स्तरावर वेदांत ज्ञानाचे शिक्षणही त्यांनी सोपे केले. २०१४ मध्ये त्यांनी विश्वविद्येची स्थापना केली. त्याचे कार्यालय रिओ दि जानेरो येथे आहे. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४padma shri awardsपद्मश्री पुरस्कारDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूNarendra Modiनरेंद्र मोदी