शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शाहीनबागमधील आंदोलनात प्रजासत्ताक दिन, मध्यरात्रीच सुरू झाला सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 03:05 IST

रविवारी सकाळी शाहीनबागमध्ये हजारो आंदोलक उपस्थित होते.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुमारे दीड महिन्यापासून दिल्लीत शाहीनबाग येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. रविवारी राजधानी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असतानाच शाहीनबागमध्ये आंदोलकांनी ध्वजारोहण केले. राजपथवर प्रजासत्ताक दिन सोहळा पाहण्यासाठी जाणाऱ्या दिल्लीकरांप्रमाणेच शाहीनबागमध्येही प्रचंड उत्साही वातावरण होते.

रविवारी सकाळी शाहीनबागमध्ये हजारो आंदोलक उपस्थित होते. त्यामुळे कालिंदी कुंज पार्कपर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर प्रचंड गर्दी झाली होती. मध्यरात्रीनंतरच येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू झाला. आंदोलकांनी राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करून राष्ट्रगीताचे गायन केले.

आंदोलनात सहभागी झालेल्या वृद्ध महिला, रोहित वेमुलाची आई आणि मॉब लिंचिंगमध्ये मारला गेलेला जुनैद खान याची आई यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण पार पडल्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. शाहीनबागमधील हा ध्वजारोहण सोहळा देशभरात सीएएविरोधात एकवटलेल्या महिलांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.

मुखतार्त खातून यांनी सांगितले की, आम्ही येथे प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत कारण आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. माझ्यासाठी नव्हे तर माझ्या मुलांना स्वातंत्र्य हवे. शाहीनबागमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून मी दररोज येथे येत आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन आमच्या लढ्याला आणखी बळ देईल, असा विश्वासही खातून यांनी व्यक्त केला.हिजाब अन् बांगड्या तिरंगीशाहीनबागमधील आंदोलक महिलांनी वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला. महिलांनी परिधान केलेला हिजाब आणि बांगड्याही तिरंगी होत्या. त्यामुळे शाहीनबागमध्ये रविवारी तिरंगी उत्सव साजरा झाला.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन