शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारत दाखवणार 'रुद्रा'वतार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 5:57 PM

भारताच्या 69व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साह असून, राजपथावर भारतीय लष्कराचे तिन्ही दल संचलन करणार आहेत.

नवी दिल्ली- भारताच्या 69व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साह असून, राजपथावर भारतीय लष्कराचे तिन्ही दल संचलन करणार आहेत. या संचलनात हवाई दलाच्या थक्क करणा-या कसरती पाहायला मिळणार आहेत. या संचलनात भारतीय बनावटीच्या रुद्र या हेलिकॉप्टरचा थरार अनुभवता येणार आहे.भारतीय हवाई दलाचं लढाऊ हेलिकॉप्टर रुद्र पहिल्यांदाच या संचनलात दिसणार आहेत. हवाई दलातर्फे करण्यात येणा-या संचलनात 21 लढाऊ विमानं, 12 हेलिकॉप्टर, 5 ट्रान्सपोर्टर सहभागी होतील, अशी माहिती हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन राहुल भसीन यांनी दिली आहे. या संचलनात आसियानच्या झेंड्यासह एक Mi-17 V5 हे विमानंही सहभागी होणार आहे.19 ते 30 जानेवारीदरम्यान आसियान संमेलनाचं आयोजन करण्यात येणार असून, या समारंभात आसियान देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. या संचनलात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त विमानं सहभाग नोंदवणार आहेत. यात 8 सुखोई-30 विमानं, 5 एमआय-17 हेलिकॉप्टर्स, 4 ध्रुव हेलिकॉप्टर्स, 3 रुद्र अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर, 1 अवेक्स, 3 तेजस, 5 जग्वार, 5 मिंग-29, 3 सी-130 हर्क्युलस, 1 ग्लोब मास्टर सी-17 सहभागी होणार आहेत. रुद्र हेलिकॉप्टरमध्ये काय आहे विशेष ?रुद्र हेलिकॉप्टर हे आक्रमक हेलिकॉप्टर म्हणून ओळखलं जातं. भारतीय बनावटीच्या या हेलिकॉप्टरच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला कॅमेरे बसवण्यात आले असून, हे कॅमेरे रात्र, दिवस किंवा वातावरण खराब असलं तरी शत्रूवर अचूक लक्ष ठेवून असतात. या हेलिकॉप्टरमध्ये बसवण्यात आलेली गन वैमानिकाच्या हेल्मेटसारखी फिरणार आहे. अशा परिस्थितीत पायलटला शत्रूला टार्गेट करणं सोपं जाणार आहे. रुद्रमध्ये एमएम टार्गेट अजूक टिपणा-या गनबरोबरच हवेतल्या हवेत शत्रूला लक्ष्य करण्यासाठी मिसाइलही बसवण्यात आली आहेत. तसेच या हेलिकॉप्टरच्या दिशेनं येणा-या मिसाइलला निष्क्रिय करण्याची रुद्र हेलिकॉप्टरमध्ये क्षमता आहे. रुद्रमध्ये एका वेळी दोन वैमानिक बसू शकतात, त्या हेलिकॉप्टरमध्ये 14 लोकांची आसन व्यवस्था आहे. 

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८airforceहवाईदल