शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदाराला दिल्लीचा अधिकारी भिडला! यमुनेच्या पाण्याने अंघोळ केली, व्हिडीओही टाकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 14:10 IST

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यावर फेस दिसला होता. या फेस घालविण्यासाठी दिल्ली जलबोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एँटी फॉगिंग केमिकलचा वापर केला होता.

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यावर फेस दिसला होता. या फेस घालविण्यासाठी दिल्ली जलबोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एँटी फॉगिंग केमिकलचा वापर केला होता. यावरून भाजपाचे खासदार प्रवेश सिंह वर्मा यांनी यमुनेच्या किनारी जात या अधिकाऱ्यांना अत्यंत वाईट भाषेत सुनावले होते. छट पूजेला येणाऱ्या लोकांना विषारी केमिकल मिश्रित पाण्यात अंघोळ करायला लावली जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

यावेळी हे पाणी पिऊन दाखव, अंघोळ करून दाखवा,  असे आव्हानही अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. यावर अधिकाऱ्यांनी या केमिकलला अमेरिकेच्या एफडीए, केंद्र सरकारची परवानगी असल्याचे पत्र या अधिकाऱ्याने दाखविले होते. तरीही खासदार ऐकायला तयार नव्हते. या दोघांमध्ये वाद पहायला मिळाला होता. आज दिल्ली जलबोर्डाचे संचालक संजय शर्मा यांनी यमुनेच्या त्यात पाण्याने अंघोळ केली. मिडीयाच्या कॅमेरांसमोर यमुनेचे पाणी गोळा करण्यात आले. ते पाणी एका मोठ्या पिंपात घेऊन मगद्वारे अंगावर घेत त्यांनी अंघोळ केली. यमुनेचे पाणी अंघोळीच्या लायक असल्याचे त्यांनी दाखविले. 

तत्पूर्वी शर्मा यांनी कालिंदी कुंज पोलीस ठाण्यात प्रवेश सिंह वर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. यामध्ये वर्मा यांनी आपल्यासोबत गैरव्यवहार केला. अभद्र भाषेत वाद घातला, तसेच यमुनेच्या पाण्यात मी विष टाकत असल्याचा अपप्रचारही केला. अँटी फोमिंग केमिकलला डीजेबीची मंजुरी आहे, केंद्रीय मंत्रालयाची देखील मंजुरी आणि स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत शिफारसही आहे. वर्मा आणि बग्गा यांच्यासह काही लोकांनी आपल्या कामात अडथळा आणला आणि धमक्या दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. 

भाजप खासदारांचा व्हिडीओ...

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपा