शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट असूनही स्वत:ला वाचवू शकला नाही; ४१ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 16:37 IST

gaurav gandhi cardiologist : वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी डॉ.गौरव गांधी यांच्या निधनामुळे डॉक्टरांना देखील धक्का बसला आहे.

gaurav gandhi jamnagar । अहमदाबाद : देशातील तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटना समोर येत असतानाच गुजरातमधील जामनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जामनगर येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.गौरव गांधी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ४१ वर्षीय गौरव गांधी यांना जामनगरसह आजूबाजूच्या परिसरात हृदयरोगतज्ज्ञ म्हणून ओळखले जायचे. पण त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली असून एवढा तरूण कसा काय हृदयविकाराच्या झटक्याचा बळी ठरू शकतो असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्यानं अनेकांना या आजारातून बाहेर काढलं तोच याचा शिकार झाल्याने अनेकांना धक्का बसला. 

इस्पितळात जात होते गांधीवयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी डॉ.गौरव गांधी यांच्या निधनामुळे डॉक्टरांना देखील धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या वाढत्या घटनांना आळा कसा घालायचा? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. गौरव गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते घरून इस्पितळाकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि छातीत जोराने दुखू लागल्याने त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. गौरव गांधी यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गांधी यांच्या निधनाने एकच शांतता पसरली. इस्पितळाच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक जमू लागली. 

हृदयविकारामुळे मृत्यू गौरव गांधी यांनी एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण जामनगर येथून घेतले होते. त्यानंतर कॉर्डियोलॉजीच्या शिक्षणासाठी त्यांनी अहमदाबाद गाठले. तेव्हापासून गांधी जामनगरमध्ये हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांवर उपचार करत होते. त्यांनी अल्पावधीतच त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी परिसरात नावलौकिक मिळवला होता. 

दरम्यान, डॉ. गांधी स्वत: हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी देवदूत होते पण आज याच आजाराने त्यांना रूग्णांपासून कायमचे दूर नेले. हृदयविकाराचा झटका कसा थांबवला जाईल या अभियानात ते सहभाही होते आणि या झटक्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी ते लोकांना जागरूक करत होते. फेसबुकवर बनवलेल्या ग्रुपमध्ये त्यांच्या अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यात ते हृदयविकाराने त्रासलेल्यांना मार्गदर्शन करत आहेत.

टॅग्स :Gujaratगुजरातdoctorडॉक्टरHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू