शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

धार्मिक संस्थांना पॅन-आधार कार्डची जोडणी करणं गरजेचं नाही - सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 15:54 IST

धार्मिक संस्थांना आपले पॅन कार्ड आधार कार्डसोबत जोडण्याची आवश्यकता नाही, असे केंद्र सरकारनं स्पष्ट केले आहे. कारण अशा प्रकारच्या संस्था आधार कार्ड मिळवण्यास पात्रच नसतात.

नवी दिल्ली, दि. 4 - धार्मिक संस्थांना आपले पॅन कार्ड आधार कार्डसोबत जोडण्याची आवश्यकता नाही, असे केंद्र सरकारनं स्पष्ट केले आहे. कारण अशा प्रकारच्या संस्था आधार कार्ड मिळवण्यास पात्रच नसतात.  लोकसभेतील एका सदस्याच्या प्रश्नाला लेखी स्वरुपात उत्तर देताना वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सांगितले की, धार्मिक संस्थांना आणि अन्य धार्मिक समूहाला आपले पॅन कार्ड आधार कार्डसोबत जोडणे गरजचे नाही. 

त्यांनी असेही सांगितले की, धार्मिक संस्था आणि धार्मिक समूह आधार कार्ड प्राप्त करण्यास पात्र नाहीत. त्यामुळे आयकर कायदा 139 ए कलम लागू होत नाही. अशा वेळी ' धार्मिक संस्थांना त्यांचे पॅनकार्ड आधार कार्डसोबत जोडण्याची आवश्यकता नाही'

तुमचंही पॅनकार्ड रद्द झालं नाही ना ? तपासून पाहाकेंद्र सरकारकडून जवळपास 11 लाख 44 हजार 211 पॅनकार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार देशातील नागरिक एकच पॅनकार्ड वापरू बनवू शकतो. मात्र वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी मंगळवारी संसदेत सांगितले की, देशात अशा अनेक व्यक्ती आढळून आल्या आहेत, ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड आहेत. अशा पॅनकार्डची संख्या 11 लाख 44 हजार 211 एवढी असल्याचेही त्यांनी सांगितले. ही सर्व पॅनकार्ड रद्द करण्यात आली आहेत. 

गंगवार यांनी राज्यसभेत लेखी स्वरुपात उत्तर दिले की,  27 जुलैपर्यंत एका व्यक्तीच्या नावे एकाहून अधिक पॅनकार्ड असल्याचे आढळून आले. यांची संख्या 11,44,211 एवढी आहे.  ही सर्व पॅनकार्ड आता रद्द करण्यात आली आहेत. त्यांनी असेही सांगितले की, पॅनकार्ड वाटपाच्या नियमानुसार, एका व्यक्तीला एकावेळी एकच पॅनकार्ड देण्यात येते.  तर दुसरीकडे 27 जुलैपर्यंत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान  1,566 बनावट पॅन कार्डदेखील आढळून आली आहेत.  

 

3. जी माहिती तुमच्या पॅनकार्डवर आहे तिच माहिती ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला द्यावी लागणार. त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरावा. उदाहरणार्थ जर आडनाव किंवा मधले नाव नसल्यास तो रकाणा भरण्याची आवश्यकता नाही. याव्यतिरिक्त तुम्हाला मोबाइल नंबर द्यावा लागेल. मोबाइल नंबर दिल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. ही माहिती सबमिटी केल्यानंतर आणखी एक नवी विंडो ओपन होईल. या विंडोवर मोबाइलवर आलेला OTP क्रमांक टाकावा आणि क्लिक पर्याय निवडावा.

4. यानंतर ओपन होणा-या पुढील विंडोमध्ये तुम्हाला तुमचे पॅन कार्ड रद्द केले आहे की केलेले नाही, याची माहिती उपलब्ध होईल.  

31 ऑगस्टपर्यंत आधार कार्डसोबत जोडा पॅन कार्ड सरकारनं करदात्यांना आधार कार्ड पॅन कार्डसोबत जोडण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे.  31 ऑगस्टपर्यंत पॅन कार्ड जोडले नाही तर ते रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.