शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्वातंत्र्य; अमेरिकेचा अहवाल भारताने फेटाळला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 04:50 IST

भारतात बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांवर हल्ले चढविले जात आहेत, असा आरोप करणारा अमेरिकी परराष्ट्र खात्याचा ताजा अहवाल भारताने फेटाळून लावला.

नवी दिल्ली : भारतात बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांवर हल्ले चढविले जात आहेत, असा आरोप करणारा अमेरिकी परराष्ट्र खात्याचा ताजा अहवाल भारताने फेटाळून लावला. देशात सहिष्णुतेचे वातावरण कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.गोहत्या किंवा गोमांस विक्री केल्याच्या आरोपावरून भारतात हिंदूंनी अल्पसंख्याकांवर विशेषत: मुस्लिमांवर हल्ले केल्याचे प्रकार गेल्या वर्षीही सुरू राहिले, असा आरोप या अहवालात होता. त्यातील निष्कर्षांबाबत भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितले की, भारत हा लोकशाही देश असून आमच्याकडे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे पालन केले जाते. सहिष्णूता व सर्वसमावेशकता टिकून राहावी यासाठी आम्ही दक्ष असतो.भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना मूलभूत हक्क तसेच धार्मिक स्वातंत्र्य प्रदान केले आहे. देशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे नेहमीच रक्षण करते. त्यामुळे परक्या देशाने किंवा तेथील सरकारला भारतातील नागरिकांच्या स्थितीबद्दल मतप्रदर्शन करण्याचा काहीही अधिकार नाही.उलट अशा बहुतांश घटना स्थानिक वादातून किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे झाल्याचे दिसून येते.भाजपचे म्हणणे काय?हा अहवाल भाजपनेही फेटाळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि त्यांचा पक्ष यांच्याविषयी मनात पूर्वग्रह ठेवून तो तयार केला असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. या अहवालात भाजप पदाधिकाऱ्यांवर समाजात द्वेष पसरविणारी भाषणे करण्याचा आणि सरकारवर स्वघोषित गोरक्षकांना पाठीशी घालण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.त्याचा ठामपणे इन्कार करीत भाजपचे राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनिल बालुनी यांनी निवेदनात म्हटले की, अल्पसंख्य समाजाविरुद्ध योजनाबद्ध पद्धतीने हिंसाचार केला जातो, हे या अहवालातील मूलभूत गृहीतकच धादांत खोटे आहे.

 

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिका