शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Delhi Election: धार्मिक कटुतेला लोकांनी ठोकरले; भाजपच्या पराभवाची मालिका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 08:17 IST

दिल्लीच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया : समविचारी पक्षांनी एकत्र यावे

पुणे/मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीमधे आम आदमी पार्टीला (आप) लोकांनी पुन्हा संधी देऊन विकासाला मत दिले असून, धार्मिक कटुता पसरविणाऱ्या प्रचाराला ठोकरले आहे. भारतीय जनता पार्टी ही आपत्ती असल्याचे लोकांना पटले असून त्यांच्या पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना ते म्हणाले, केजरीवाल यांनी वीजबिल, पाणीपट्टी, शिक्षणपद्धतीत सुधारणेसाठी घेतलेल्या निर्णयाला मतदारांनी साथ दिली. हा निकाल म्हणजे अहंकाराला दिलेली चपराक आहे. शाहीनबागमधे जे सुरू होते, ते पाहता भाजपाचा पराभव निश्चितच होता.

भाजपाने धार्मिक कटुता वाढेल याची जाणीवपूर्क काळजी घेतली. ‘त्यांना मारा, त्यांना गोळी घाला...’ अशा घोषणाही दिल्या गेल्या. मात्र लोकांनी ते मान्य केले नाही. दिल्लीवासीयांनी दिलेला कौल हा केवळ त्या राज्यापुरता मर्यादित नाही. इतर राज्यातही त्याचे पडसाद उमटतील. त्यामुळे भाजपाची पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नाही. आता आम्हा लोकांची जबाबदारी आहे. इथून पुढे किमान समान कार्यक्रम घेऊन काम करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

देशातील समविचारी पक्षांचे नेते मिळून याविषयी नक्कीच विचार करू. भाजपामध्येही मोदी-शहा यांच्याबद्दल दहशत आहे. त्याच पक्षातील खासदारांना ‘तुमचे कसे चालले आहे’ असे विचारले असता, तेही इकडे-तिकडे बघून कोणी ऐकत नसल्याचीखबरदारी घेऊन बोलतात. संसदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत दहशतीचे वातावरण असल्याचे जाणवते, असेहीे पवार यांनी सांगितले.प्रादेशिक पक्षांची वाढती ताकदपंजाबसह उत्तरेतील काही राज्ये आणि दक्षिणेत तमिळनाडू, ओरिसामध्ये भाजपाला पर्यायी पक्षांची ताकद वाढत आहे. डाव्यांचीही ताकद वाढत आहे.च्महाराष्ट्रात झालेला प्रयोग आपल्याकडे व्हावा अशी लोकांची इच्छा आहे. लोकांना एकसमान विचाराचा कार्यक्रम मांडण्याची अपेक्षा आहे.च्देशभरातच हा विचार दिसून येत आहे. त्यामुळे त्या विरोधात एकत्र येण्याची लोकभावना असल्याचेही पवार यांनी सांगितले.राज ठाकरेंना गांभीर्यानेघेण्याची गरज नाहीराज ठाकरे यांनी नुकताच हिंदुत्वाचा मुद्दा घेत भगवा झेंडा हाती घेतला आहे. या बदललेल्या भूमिकेवरही शरद पवार यांनी टीका केली. काही लोक भाषण पहायला येतात. काही लोक बघायला येतात. मात्र, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांची भाषणे म्हणजे करमणूक असल्याचे पवार यांनी नमूद केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी घेतलेली जाहीर भूमिका महाआघाडीला पूरक होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआप