शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लालू यादव, राबडी देवी अन् तेजस्वी यादव यांना दिलासा; लँड फॉर जॉब प्रकरणात जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 10:53 IST

गेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व १७ आरोपींना समन्स बजावले होते. न्यायालयाने सर्व आरोपींना ४ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

नवी दिल्ली: लँड फॉर जॉब प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने नियमित जामीन मंजूर केला आहे. लँड फॉर जॉब प्रकरणातील लालू आणि राबरी यांच्यासह सहा आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. ती ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व ६ आरोपींना जामीन मंजूर केला आहे.

 

गेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व १७ आरोपींना समन्स बजावले होते. न्यायालयाने सर्व आरोपींना ४ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणात लालू यादव, राबडी देवी आणि त्यांची मुलगी मीसा भारती जामिनावर आहेत. या प्रकरणातील पहिल्या आरोपपत्रात या तिघांना आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयने नवीन आरोपपत्र दाखल केले आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही आरोपी केले. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर त्या मालमत्तेची रजिस्ट्री त्यांच्या नावावर असल्याचा आरोप आहे, ज्यांची नोंदणी लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना लोकांना नोकरी देण्याच्या बदल्यात करून दिली होती.

लँड फॉर जॉब घोटाळा म्हणजे काय?

यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री असलेले पवन बन्सल यांचे पुतणे विजय सिंगला यांच्यावरही रेल्वे भरतीशी संबंधित आणखी एका घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणीही सीबीआयने विजय सिंगला यांच्यासह १० जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात विजय सिंगला यांच्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप आहे. २००४ ते २००९ दरम्यान लालू प्रसाद यादव यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते. लालू रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप आहे. नोकरी देण्याच्या बदल्यात अर्जदारांकडून जमीन आणि भूखंड घेतल्याचे बोलले जात आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलगी मीसा भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्या जमिनी घेतल्या आहेत त्या राबडी देवी आणि मिसा भारती यांच्या नावावरही घेतल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहारCourtन्यायालय