शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबू नायडूंना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! कौशल्य विकास प्रकरणात नियमित जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 16:40 IST

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने कौशल्य विकास प्रकरणात मोठा दिलासा देत चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन दिला आहे.

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने आज सोमवारी २० नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना दिलासा दिला आहे. कौशल्य विकास प्रकरणात नियमित जामीन मंजूर केला आहे. नायडू २८ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामिनावर येणार आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला त्यांना आरोग्याच्या कारणास्तव चार आठवड्यांसाठी सशर्त अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. नायडूंना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी जामीन आवश्यक असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.

“ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी ईडीचे छापे”; महुआ मोइत्रांचा भाजपला खोचक टोला

न्यायालयाने नायडू यांना एक लाख रुपयांचा जामीन मुचका भरण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय, कोर्टाने नायडू यांना सीलबंद कव्हरमध्ये मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांना त्यांच्या उपचाराचा तपशील आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले रुग्णालयतील अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

नायडू यांना ३,३०० कोटी रुपयांच्या कथित आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. आंध्रचे मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या वर्षी मार्चमध्ये आंध्र प्रदेश पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात भारतीय रेल्वे वाहतूक सेवेचे माजी अधिकारी अर्जा श्रीकांत यांनाही नोटीस देण्यात आली होती. श्रीकांत २०१६ मध्ये APSSDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

APSSDC ची स्थापना २०१६ मध्ये नायडू यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात बेरोजगार तरुणांना त्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी करण्यात आली होती. यासाठी तत्कालीन नायडू सरकारने ३,३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.

सामंजस्य करारामध्ये सीमेन्स इंडस्ट्री सॉफ्टवेअर इंडिया लिमिटेड आणि डिझाइन टेक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश होता, यांना कौशल्य विकासासाठी सहा केंद्रे स्थापन करण्यास सांगितले होते.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूCourtन्यायालय