शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
5
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
6
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
7
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
8
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
9
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
10
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
11
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
12
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
13
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
14
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
15
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
16
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
17
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
18
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
19
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
20
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."

"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:29 IST

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांना पत्र लिहून पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज देण्याची मागणी केली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या इतर भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेजची मागणी केली आहे. 'ज्याठिकाणी पाकिस्तानी गोळीबारात ४ मुलांसह १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले, पूंछमधील त्या ठिकाणाला मी अलिकडेच भेट दिली होती", असंही या पत्रात म्हटले आहे. 

राहुल गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, या अचानक आणि अंदाधुंद हल्ल्यामुळे सामान्य भागात प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो घरे, दुकाने, शाळा आणि धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक पीडितांनी सांगितले की त्यांचे वर्षानुवर्षे केलेले कष्ट एकाच झटक्यात वाया गेले.

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले की, पूंछ आणि इतर सीमावर्ती भागातील लोक गेल्या अनेक दशकांपासून शांततेत आणि बंधुत्वाने राहत आहेत. आज, जेव्हा ते या गंभीर संकटातून जात आहेत, तेव्हा त्यांचे दुःख समजून घेणे आणि त्यांचे जीवन पुन्हा उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. "मी भारत सरकारला पूंछ आणि पाकिस्तानच्या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या इतर सर्व भागांसाठी एक ठोस आणि उदार मदत आणि पुनर्वसन पॅकेज तयार करण्याची विनंती करतो, असंही राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वीच पूंछला भेट दिली

खासदार राहुल गांधी यांनी नुकतीच जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारातील पीडितांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबांचे दुःख 'मोठे दुःख' असल्याचे वर्णन केले आणि हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूर