शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांना दिलासा! PNG-CNG च्या किमती कमी होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 21:57 IST

पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नवीन फॉर्म्युल्यानुसार, घरगुती नैसर्गिक वायूची किंमत आता भारतीय क्रूड बास्केटच्या किंमतीच्या आधारावर निश्चित केली जाईल. तर, आत्तापर्यंत देशांतर्गत नैसर्गिक वायूची किंमत जगातील चार प्रमुख गॅस ट्रेडिंग हब - हेन्री हब, अल्बेना, नॅशनल बॅलन्सिंग पॉइंट (यूके) आणि रशियन गॅसच्या किमतीच्या आधारे निश्चित केली जात होती. या निर्णयामुळे येत्या दोन दिवसांत म्हणजेच शनिवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होतील. PNG ची किंमत 10% कमी होईल, तर सीएनजीच्या किंमती सुमारे 6 ते 9% कमी होतील.

बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नवीन सूत्राला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

काय असेल नवीन फॉर्म्युला?नवीन फॉर्म्युल्यानुसार गॅसची किंमत दर महिन्याला निश्चित केली जाणार आहे. तर जुन्या फॉर्म्युल्यानुसार दर सहा महिन्यांनी गॅसची किंमत ठरत होती. याशिवाय, नवीन सूत्रानुसार गेल्या एक महिन्यातील भारतीय क्रूड बास्केटची किंमत घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीचा आधार म्हणून घेतली जाईल. तत्पूर्वी, जुन्या सूत्रानुसार जगातील चारही गॅस ट्रेडिंग केंद्रांच्या मागील एका वर्षाच्या किंमतीची सरासरी घेतली जात होती आणि नंतर ती तीन महिन्यांच्या अंतराने लागू केली जात होती.

नवीन फॉर्म्युला लागू झाल्यानंतर पीएनजी आणि सीएनजी स्वस्त होणार असल्याचा सरकारचा दावा आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना अधिक स्थिर दराने गॅस मिळेल. याशिवाय खते बनवणाऱ्या कंपन्यांना स्वस्तात गॅस मिळणार असून, त्यामुळे खतावरील अनुदान कमी होणार आहे. नवीन फॉर्म्युला लागू झाल्याने ऊर्जा क्षेत्राला स्वस्त गॅस मिळणार आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी