शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा; रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 06:37 IST

खरिपापाठोपाठ रब्बी हंगामातील सर्व पिकांच्या किमान आधारभूत किमतींत (एमएसपी) मोठी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने

नवी दिल्ली : खरिपापाठोपाठ रब्बी हंगामातील सर्व पिकांच्या किमान आधारभूत किमतींत (एमएसपी) मोठी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनास मंगळवारी दिल्लीत लागलेले हिंसक वळण आणि मध्य प्रदेश व राजस्थानसह काही राज्यांमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे.

शेतकऱ्यांनाना त्यांच्या शेतमालाला खर्चाच्या किमान दीडपट हमीभाव देऊन त्यांचे उत्पन्न येत्या पाच वर्षांत दुप्पट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांतून शेतकºयांना ६२,६३५ कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न मिळू शकेल, असा सरकारचा दावा आहे. ही वाढीव ‘एमएसपी’ यंदाच्या खरीप हंगामात घेतल्या जाणाºया व पुढील हंगामात विक्रीसाठी बाजारात येणाºया पिकांसाठी आहे.  सरकारनं गव्हाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 105 रुपयांची वाढ केली आहे. याआधी एक क्विंटल गव्हाला 1,735 रुपये इतकी आधारभूत किंमत दिली जात होती. ती आता 1,840 रुपये करण्यात आली आहे. 

हरभऱ्याची आधारभूत किंमतदेखील वाढवण्यात आली आहे. आधी हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,440 रुपये इतकी आधारभूत किंमत दिली जात होती. आता हरभऱ्याला 4,620 रुपये इतकी आधारभूत किंमत दिली जाईल. तर मसूर डाळीला 4,475 रुपये प्रति क्विंटल इतकी आधारभूत किंमत मिळेल. याआधी ती 4,250 रुपये इतकी होती. कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशीनंतर केंद्र सरकारनं रबी पिकांच्या आधारभूत किमती वाढवण्याचा निर्णय घेतला. गव्हाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 105 रुपयांची वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव सीएसीपीनं केंद्र सरकारला दिला होता. हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटनं आज मंजूर केला. यासोबतच मोहरी, हरभरा, मसूर यांच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्याची शिफारसदेखील सीएसीपीनं केली होती. या सर्व शिफारशी मोदी सरकारनं मंजूर केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार