शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘चेसिंग द व्हायरस’ मोहिमेने दिलासा, देशाच्या तुलनेत मुंबईची स्थिती चांगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 08:51 IST

रुग्णदुपटीचा वेग २४ दिवसांवर : देशाच्या तुलनेत मुंबईची स्थिती चांगली

मुंबई : गेल्या महिन्यात महापालिकेने सुरू केलेल्या ‘चेसिंग द व्हायरस’ या मोहिमेचे चांगले परिणाम आता मुंबईत दिसत आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या १६ दिवसांत दुप्पट होत आहे. मुंबईत मात्र हे प्रमाण २४.५ दिवसांवर पोहोचले आहे. मुंबईतील मृत्यूदर देशाच्या बरोबरीने तीन टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४४ टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत नियंत्रणात असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यापासून एप्रिल महिन्यात सात दिवसांत रुग्ण दुप्पट होत होते. हे प्रमाण २० दिवसांवर आणण्यासाठी राज्य सरकारने गेल्या महिन्यात आठ सनदी अधिकाऱ्यांची टीम तयार केली. मुंबईतील सात परिमंडळांची जबाबदारी व कोरोना नियंत्रणात आणण्याचे काम या अधिकाऱ्यांना विभागून देण्यात आले होते. या काळात केलेल्या उपाययोजनांमुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण १६ दिवसांवर पोहोचले. ते आता २४.५ दिवस झाले आहे.मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ‘चेसिंग द व्हायरस’ या मोहिमेच्या माध्यमातून अनेक बदल घडवून आणले. यामध्ये एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १५ जणांना क्वारंटाइन करणे, रुग्णांवर दर्जेदार उपचार, योग थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या साहाय्यक उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढ्यात लवकरच यशस्वी होऊ, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.पालिकेच्या माध्यमातून मुंबईत १६८ ठिकाणी डायलिसीसची सुविधा सुरू केली. त्यामुळे गेल्या २० दिवसांत एकही डायलिसीसअभावी मृत्यू झाला नाही. विभाग स्तरावर सुरू केलेल्या वॉररूममुळे खाटा न मिळणे या तक्रारी दूर होणार आहेत. तसेच खासगी रुग्णालय, नर्सिंग होममध्ये चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.हॉटस्पॉट बनलेल्या धारावी विभागात सध्या रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण तब्बल ४२ दिवसांवर गेले आहे. गेल्या महिन्यात या विभागात एका दिवसात ८० ते ९० कोरोनाबाधित आढळून येत होते. हे प्रमाण आता दररोज सरासरी दहा रुग्ण आहे. मुंबई पालिकेकडे सध्या ५० हजारांहून जास्त रुग्णखाटा उपलब्ध आहेत. यापैकी10400खाटा पालिकेच्या पोर्टलवर नोंदणीसाठी उपलब्ध आहेत. पुढील दहा दिवस प्रतिदिन ३०० आयसीयू खाटा वाढविण्यात येतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई