शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्होडाफोन, एअरटेलविरोधात जिओची तक्रार; शेतकरी आंदोलनाचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:55 IST

कंपन्यांकडून अनैतिक मार्गांचा अवलंब

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जिओचे सिमकार्ड इतर कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे जिओला मोठा फटका बसला असून, याप्रकरणी जिओने दूरसंचार नियामक ‘ट्राय’कडे व्हाेडाफोन इंडिया आणि एअरटेल यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. या दोन्ही कंपन्या अनैतिक मार्गांचा अवलंब करून जिओविरुद्ध अफवा पसरवीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी बिलांच्या विरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.  नव्या कृषी कायद्यांमुळे रिलायन्स उद्योगसमूहास फायदा होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे रिलायन्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचा फटका जिओला बसला असून, जिओची सिमकार्ड‌्स इतर कंपन्यांकडे हस्तांतरित (पोर्ट) करून घेण्याच्या विनंत्या जिओला हजारोंच्या संख्येने मिळत आहेत. या सर्व प्रकारामागे व्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांचा थेट हात असल्याचा आरोप जिओने केला आहे. नव्या कृषी कायद्यांचा रिलायन्सला फायदा होणार असल्याची अफवा व्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांनी पसरविली असल्याचा आरोप जिओने केला आहे. दोन्ही कंपन्यांनी फेटाळले आरोपव्होडाफोन इंडिया आणि एअरटेल यांनी जिओचे आरोप फेटाळून लावले आहेत. एअरटेलने ट्रायला सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, एअरटेल मागील २५ वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रात सचोटीने व्यवसाय करीत आहे. काही स्पर्धकांनी चिथावणीखोर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, दादागिरीचे हातखंडे वापरले तरीही एअरटेलने संयम दाखवून आपले स्पर्धक आणि भागीदारांचा योग्य तो सन्मानच केला. आमच्या विरोधातील तक्रार फेटाळून लावण्याच्याच लायकीची आहे. ही तक्रार अभिरुचीहीन आणि अश्लाघ्य आहे.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनReliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेल