शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री, नेत्यांचे नातेवाईक ठरले तिकिटांचे लाभार्थी; झारखंड विधानसभेत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:42 IST

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार जोरदार सुरू

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने घराणेशाहीची पुरेपूर काळजी घेत तिकीट वाटप करताना राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या कुटुंबाना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीट वाटपामुळे घराणेशाहीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. या घराणेशाहीचा लाभ उठवत झारखंड मुक्ती मोर्चाला सोडचिठ्ठी दिलेले चंपाई सोरेन व त्यांचा मुलगा बाबूलाल सोरेने या दोघांनी तिकीट मिळविले आहे.

माजी मुख्यमंत्री, ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांची सून पूर्णिमा दास साहू यांना भाजपचे तिकीट मिळाले. भाजपच्या तिकीटावर दोन माजी मुख्यमंत्री स्वत: निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींना भाजपने विधानसभेचे तिकीट दिले आहे. एका आजारी आमदाराच्या पत्नीला तर एका माजी आमदाराच्या मोठ्या भावाला उमेदवारी मिळाली आहे.

‘इंडिया’च्या जागा वाटपावर राजदची नाराजी

- झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीत तिकीट वाटपावरून नाराजीनाट्य सुरू झाले आहे. राज्यातील ८१ जागांपैकी ७० जागांवर काँग्रेस व झामुमा उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.- इतर ११ जागा राष्ट्रीय जनता दल (राजद) व डाव्या पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. जागा वाटपाचा हा फाॅर्म्युला समोर आल्यानंतर राजदने नाराजी व्यक्त केली आहे. - मुख्यमंत्री हेमंत सोरेन व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जागा वाटपासंदर्भात निश्चित केलेला फाॅर्म्युला राजदने फेटाळून लावला आहे. जागा वाटपात पक्षाला सन्मानजनक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी गत दोन दिवसांपासून राजदचे नेते तेजस्वी रांचीमध्ये तळ ठोकून आहेत.

कुणाला मिळाली संधी?

सिमरियाचे विद्यमान आमदार आमदार किशुन दास यांच्याऐवजी उज्ज्वल दास यांना तिकीट दिले. कांके मतदारसंघात समरी लालऐवजी डॉ. जीतू चरण राम यांना तिकीट दिले. जमुआचे केदार हाजरा यांचे तिकीट कापून मंजू देवी यांना पक्षाने उमदेवारी दिली आहे. सिंदरीचे विद्यामान आमदार इंद्रजीत महतो यांना डावलून त्यांची पत्नी तारा देवीला भाजपने तिकीट दिले आहे. तीनवेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिलेले अर्जुन मुंडा यांची पत्नी मीरा मुंडा यांना मेनका सरदार यांची तिकीट कापून उमेदवारी दिली आहे. यासोबतच भाजपने राज्यात १२ महिलांना उमेदवारी दिली आहे.

आदिवासींसाठी...

- आदिवांसाठी (अनुसूचित जमाती) २८ जागा आरक्षित असून त्यापैकी २६ जागांवर भाजपने उमदेवार उभे केले आहेत.- २८ पैकी एनडीएतील घटक पक्ष आजसूला  मनोहरपूर, पाकडू व लोहरदगा हे मतदारसंघ सोडले आहेत तर तमाड विधानसभा सीट जदयू पक्षाला दिले आहे.- धनवार व जामताड या सर्वसाधारण मतदारसंघात बाबूलाल मरांडी व सीता सोरेन यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट वाटपात घराणेशाहीची पुरेपूर काळजी घेणाऱ्या भाजपने चार विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे.

टॅग्स :JharkhandझारखंडElectionनिवडणूक 2024