शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

जमात-ए-इस्लामीचे इसिससोबत होते संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 4:08 AM

अलिकडेच बंदी घातलेल्या जम्मू - काश्मिरातील सक्रीय संघटना जमात -ए-इस्लामी जम्मू काश्मीर या संघटनेचे पाकिस्तानातील आयएसआयशी संपर्क होता

नवी दिल्ली : अलिकडेच बंदी घातलेल्या जम्मू - काश्मिरातील सक्रीय संघटना जमात -ए-इस्लामी जम्मू काश्मीर या संघटनेचे पाकिस्तानातील आयएसआयशी संपर्क होता आणि ते लोक नवी दिल्लीमधील कार्यरत पाकिस्तानी उच्चायुक्तांशी सतत संपर्कात होते जेणेकरून फुटीरवादाला चालना मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.हुर्रियत कॉन्फ्रेसमध्ये जमात-ए-इस्लामीचे सर्वात महत्त्वाचे सदस्य सय्यद अली शाह जिलानी हे आहेत. एकेकाळी बंदी त्यांना ‘अमीर-ए-जिहाद’नावाने संबोधले जायचे. अधिकाऱ्याने सांगितले की, या संघटनेने पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयशी घनिष्ठ संबंध स्थापन केले होते. जेणेकरून काश्मिरी तरुणांना शस्त्रास्त्र उपलब्ध करुन देणे, प्रशिक्षण देणे ही कामे करता येतील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमात-ए- इस्लामी संघटना शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये भारतविरोधी भावना भडकाविण्याचे काम करत होती. ही संघटना १९४५ मध्ये जमात-ए- इस्लामी हिंदचा एक भाग म्हणून स्थापन करण्यात आली होती. राजकीय मतभेदांमुळे १९५३ मध्ये ही संघटना वेगळी झाली. या संघटनेवर १९७५ मध्ये दोन वर्षांसाठी आणि १९९० मध्ये तीन वर्षांसाठी बंदी आणण्यात आली होती.

टॅग्स :ISISइसिसJammu Kashmirजम्मू-काश्मीर