नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना असलेले विशेष संरक्षण गटाचे (एसपीजी) कवच टाळून स्वत:ला धोका निर्माण करून घेतला, असा आरोप करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. गांधी यांच्याविरोधातील ही याचिका विचार करण्यायोग्य नाही, असे खंडपीठाच्या कार्यकारी प्रमुख गीता मित्तल आणि न्या. सी. हरी शंकर यांनी म्हटले. सुरक्षेच्या मुद्द्यांचा विचार करण्यासाठी आमचे माध्यम योग्य नाही, असे खंडपीठाने म्हटले.
राहुल गांधी यांच्या विरोधात केलेली याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 04:26 IST