शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतपत्रिका वापरण्याची मागणी फेटाळली; ईव्हीएमच्या दुरुपयोगाची शक्यता अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 09:10 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. एका संस्थेने ही याचिका केली होती. ईव्हीएमचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेता येणार नाहीत, असे या याचिकेत म्हटले होते.

ते म्हणणे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाला पटले नाही. प्रत्येक यंत्रणेचा व यंत्रांचा चांगला व वाईट वापर होण्याची शक्यता असते. असा संशय प्रत्येक क्षेत्रात घेता येऊ शकेल, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतात ईव्हीएमचा वापर सर्वप्रथम झाला. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करण्यात येत असे. मतपत्रिकांची पळवापळवी करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला जेरीस आणण्याचे डावपेच रचले जात. प्रसंगी त्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही होत असे.गैरप्रकार आटोक्यातईव्हीएमचा वापर सुरू झाल्यापासून मतपत्रिकांमुळे होणारे गैरप्रकार आटोक्यात आले. मात्र पराभूत उमेदवार ईव्हीएमला दोष देऊ लागले. ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होतो, या यंत्रात हवे तसे बदल करवून सत्ताधारी पक्ष निवडणुकांत विजय मिळवितात, असे आरोप काही राजकीय पक्षांनी केले. ईव्हीएमचा वापर बंद करून पुन्हा मतपत्रिका आणाव्यात, या मागणीसाठी काहींनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. असाच विरोध आता व्हीव्हीपॅट यंत्रांनाही होत आहे.

टॅग्स :Courtन्यायालय