शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पक्षासमोर प्रादेशिक पक्षांचे आव्हान; ५ राज्यातील निवडणुकांमध्ये रंगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 06:17 IST

केजरीवाल पंजाबचे असले तरी त्यांना  पंजाबबाबत काहीही माहिती नाही. आमच्यासाठी ते उपरे आहेत, असे चन्नी यांनी येथे एका कार्यक्रमात म्हटले होते

व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या आव्हानाला सामोरे जावे लागत  आहे.  दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ‘काळा इंग्रज’ संबोधले आहे, तर दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांनी ३०० जागा जिंकून उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला असला तरी भाजपने समाजवादी पार्टीला गंभीर्याने घेतले आहे.

केजरीवाल पंजाबचे असले तरी त्यांना  पंजाबबाबत काहीही माहिती नाही. आमच्यासाठी ते उपरे आहेत, असे चन्नी यांनी येथे एका कार्यक्रमात म्हटले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची आम आदमी पार्टी पंजाब विधानसभेत मुख्य विरोधी पक्ष आहे.  दिल्लीतील शासनप्रणालीच्या नावावर मते मागत केजरीवाल  समाजाच्या विविध घटकांंना मोठ-मोठी आश्वासने देत आहेत. आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली-बसपा युती सत्ताधारी पक्षाचे नुकसान करू  शकतात. काँग्रेसने अद्याप उत्तरखंड आणि उत्तर प्रदेशात पक्षाचा चेहरा घोषित केलेला नाही. दुसरीकडे, मोदी आणि  योगींच्या नावांवर उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकणार असल्याचे भाजप ठणकावून सांगत आहे. तथापि,  महागाई, बेरोजगारी या मुद्द्याने भाजपचे नुकसान होईल आणि समाजवादी पार्टीला फायदा होईल, असे अंतर्गत सूत्र खासगीत मान्य करतात. आम आदमी पार्टीच्या उदयामुळे उत्तरखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसदरम्यान थेट लढत होणार नाही. गोव्यातील निवडणुकीत नेहमीच छोट्या स्थानिक पक्षांचा प्रभाव असतो. या राज्यांतील  निवडणूकपूर्व संकेतानुसार प्रादेशिक पक्ष इतरांचे मनसुबे उधळून लावतील. 

टॅग्स :Electionनिवडणूक