शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गर्भवतीला ३ रुग्णालयांनी नाकारले उपचार; रिक्षात प्रसूती झाल्यानंतर बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 17:12 IST

मध्यरात्री ३ पासून प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर ६ तास वणवण; पण ३ रुग्णालयांचा दाखल करण्यास नकार

बंगळुरू: प्रसुतीकळा सोसत असलेल्या महिलेला दाखल करून घेण्यास रुग्णालयांनी नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरूत घडला आहे. अखेर के. सी. सामान्य रुग्णालयासमोर एका रिक्षात महिलेची प्रसूती झाली. मात्र यानंतरही नवजात अर्भकाला वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाला. प्रसूतीकळा सुरू असताना महिला श्रीरापुरा सरकारी रुग्णालय, व्हिक्टोरिया रुग्णालय आणि व्हिक्टोरियाच्या प्रसूती विभागात गेली होती. मात्र तिला बेड उपलब्ध नसल्याचं उत्तर मिळालं.बंगळुरूत राहणाऱ्या महिलेला मध्यरात्री ३ वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर ती तीन रुग्णालयांमध्ये गेली. मात्र बेड उपलब्ध नसल्यानं रुग्णालयांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. जवळपास ६ तास महिला प्रसूतीकळा सहन करत महिला फिरत होती. मात्र तरीही कोणत्याही रुग्णालयानं तिला दाखल करून घेतलं नाही. अखेर रिक्षात महिलेची प्रसूती झाली. त्यानंतर रिक्षा चालक तिला घेऊन के. सी. रुग्णालयात पोहोचला. तिथेही तिला आणि तिच्या नवजात अर्भकाला उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे महिलेचं बाळ दगावलं.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट करून या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'प्रसूतीकळा सहन करत असलेल्या महिलेला बंगळुरूच्या अनेक रुग्णालयांनी उपचार नाकारले. तिनं एका रिक्षात बाळाला जन्म दिला. मात्र ते बाळ दगावलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दाखल घेऊन तत्काळ कारवाई करावी,' असं आवाहन सिद्धरामय्या यांनी केलं आहे.योग्य वेळेत उपचार न मिळाल्यानं कर्नाटकमध्ये अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात आता गर्भवती महिलेलादेखील उपचार मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पांनी महिलेला उपचार नाकारणाऱ्या सर्व रुग्णालयांचे परवाने रद्द करावेत. या प्रकरणात फक्त कारवाईचा इशारा देऊन भागणार नाही. तर प्रत्यक्ष कारवाई करावी लागेल, असं सिद्धरामय्या यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.