शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लसीकरण, घटत्या रुग्णांमुळे कोरोनाची धास्ती झाली कमी, १ कोटी १ लाख रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:09 IST

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात १०५४२८४१ कोरोना रुग्ण असून, त्यातील १०१७९७१५ जण बरे झाले आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला असतानाच दुसऱ्या बाजूस नव्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे. शनिवारी कोरोनाचे सव्वा पंधरा हजारांहून कमी नवे रुग्ण आढळून आले. लसीकरणाचा प्रारंभ व घटती रुग्णसंख्या यामुळे चिंता कमी होण्यास मदत झाली आहे. सध्या २११०३३ उपचाराधीन रुग्ण असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत २ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात १०५४२८४१ कोरोना रुग्ण असून, त्यातील १०१७९७१५ जण बरे झाले आहेत. कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या संख्येतही घट होत असून, शनिवारी १७५ जणांचा बळी गेला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५२०९३ झाली आहे. या संसर्गातून बरे झालेल्यांचे प्रमाण ९६.५६ टक्के असून, मृत्यूदर १.४४ टक्के आहे. जगभरात ९ कोटी ४३ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ६ कोटी ७३ लाख रुग्ण बरे झाले तर बळींचा आकडा २० लाखांवर गेला आहे. अमेरिकेमध्ये २ कोटी ४१ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील १ कोटी ४२ लाख रुग्ण बरे झाले व चार लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.  

..तर भारत बायाेटेक देणार नुकसानभरपाईया लसीचे काही दुष्परिणाम झाल्यास कंपनी नुकसान भरपाई देणार असल्याचे भारत बायोटेकने जाहीर केले. लसीमुळे गंभीर आजार किंवा स्थिती उद् भवल्यास नुकसानभरपाई देण्यात येईल. मात्र, तसे सिद्ध करावे लागेल, असे कंपनीने म्हटले आहे. 

यांनी घेतली लस -अनिल विज  -   भारतज्यो बायडेन   -   अमेरिकाकमला हॅरिस   -  अमेरिकामाईक पेन्स  -  अमेरिकाराणी एलिझाबेथ  -  ब्रिटनप्रिन्स फिलीप  -  ब्रिटनबेंजामिन नेतान्याहू  -  इस्रायलयुली एडेलस्टिन  -  इस्रायलसलमान बिन  -  सौदी अरेबियाअल् सौद

पोप फ्रान्सिस  -  व्हॅटिकन सिटीमाजी पोप बेनेडिक्ट   -  व्हॅटिकन सिटीजोको विडोडो  -  इंडोनेशिया

सरकारी रुग्णालयांत कोवॅक्सिन तर खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड -दिल्लीत लसीकरण मोहिमेत सरकारी रुग्णालयांत कोवॅक्सिन तर खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड ही लस देण्यात येत आहे. असा भेदभाव का करण्यात आला असा सवाल काही जणांनी उपस्थित केला आहे. दिल्लीतील सरकारी रुग्णालयांत कोवॅक्सिन तर ४२ खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड ही लस देण्यात आली. कोणती लस कुठे पाठवायची याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

राममनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांचा कोवॅक्सिन लस घेण्यास नकार - दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी कोवॅक्सिन लस टोचून घेतली नाही. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही कोवॅक्सिन ही लस घेणार नाही.

 कोविशिल्ड लस सुरक्षित असून तिच्या सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. या पत्राबाबत राममनोहर लोहिया रुग्णालयात्चे अधीक्षक डॉ. ए. के. राणा यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. कोवॅक्सिन ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.

गोव्यात सातशे कर्मचाऱ्यांना कोविड विरोधी लस - पणजी : बांबोळीच्या गोमेकॉ रुग्णालयात मल्टी टास्क आरोग्य कर्मचारी म्हणून काम करणारा रंगनाथ भजजी हा शनिवारी, गोव्यात कोविडविरोधी लस घेणारा पहिला कर्मचारी ठरला. राज्यात एकूण सात ठिकाणी दिवसभरात ७०० जणांनी कोविडविरोधी लस घेतली. 

लसीकरणास बांबोळीच्या गोमेकॉ रुग्णालयातून आरंभ झाला. त्यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशेष उपस्थिती होती. रंगनाथ भजजी हे गोमेकॉमध्ये सफाईचेही काम करतात. ते वाडे सुकूर येथील आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या