शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘चाइल्ड लॉक’ यंत्रणेला मिळाला रेड सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 03:42 IST

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचा निर्णय; १ जुलै २०१९ पासून होणार अंमलबजावणी

पुणे : प्रवासी कार किंवा टॅक्सीमधील दरवाजांमध्ये ‘चाइल्ड लॉक’ यंत्रणा बसविण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ जुलै २०१९ पासून होणार आहे. ‘चाइल्ड लॉक’चा गैरवापर होत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. कार उत्पादन कंपन्यांकडून दरवाजांना ‘चाइल्ड लॉक’ ही अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कार रस्त्यावर धावत असताना अनेकदा लहान मुले दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अपघात होण्याची शक्यता असते. ‘चाइल्ड लॉक’ यंत्रणेद्वारे चारही दरवाजे उघडण्याचे बटन चालकाजवळ दिले जाते. या बटनावर चारही दरवाजे उघडण्याचे नियंत्रण अवलंबून असते. त्यामुळे चालकाशिवाय कोणीही दरवाजा उघडू शकत नाही. मात्र, या यंत्रणेचा प्रवासी कार किंवा टॅक्सीमध्ये गैरवापर होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रवासी कारबाबत नेमलेल्या समितीने दोन वर्षांपूर्वी ‘चाइल्ड लॉक’ यंत्रणेवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. ही शिफारस मंत्रालयाने स्वीकारली आहे. त्यानुसार रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांच्या परिवहन विभागाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रवासी कार उत्पादक कंपन्यांना चाइल्ड लॉक प्रणाली न बसविण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी दि. १ जुलै २०१९ पासून केली जाणार असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.चाइल्ड लॉकचा गैरवापरप्रामुख्याने प्रवासी कारमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी चाइल्ड लॉक ही यंत्रणा धोकादायक आहे, असे केंद्रीय मंत्रालयाने म्हटले आहे.मागील काही वर्षांत धावत्या प्रवासी कार-टॅक्सीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.चालकाने चाइल्ड लॉक केल्याने महिलांना दरवाजा उघडून मदत मागणे शक्य होत नाही. त्याचाच गैरफायदा घेतला गेल्याचे प्रकार समोर आले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक