शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 06:14 IST

आसाममध्ये ८५% हून, पुद्दुचेरीत ८६% हून अधिक तर केरळमध्ये ७८% हून अधिक मतदान

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानासाठी केंद्रांवर विक्रमी गर्दी केली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये ८५% हून, पुद्दुचेरीत ८६% हून अधिक तर केरळमध्ये ७८% हून अधिक विक्रमी मतदान झाले आहे. 

एलडीएफ-यूडीएफमध्ये चुरस

केरळ: केरळमधील १४० विधानसभा मतदारसंघांसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात ६२.७१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. राज्यात सत्ताधारी एलडीएफ, काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि भाजप यांच्यात त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळत आहे. 

बोगस मतदानाचे आरोप

राज्यात मतदान प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले. त्रिशूरच्या मनलूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापट झाली. तसेच वडक्कनचेरी आणि कोळीकोडमध्ये काही मतदारांचे मतदान आधीच ‘टेंडर वोट’ म्हणून नोंदवले गेल्याचे समोर आल्याने गोंधळ उडाला. या मतदारांना मतदान करण्यापासून रोखल्याने भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

त्रिशूरमधील वानियामपारा येथे एका वृद्धाचा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मृत्यू झाला. विनोदन असे त्यांचे नाव असून, ते रामनचिराचे रहिवासी होते. 

महत्त्वाची आकडेवारी

८१.०२% - कोळीकोड    ७०.७५% - पथानामथिट्टा७८.१२% - एकूण मतदान

आसाममध्ये पावसाच्या सावटातही मतदारांचा उत्साह

आसाम: आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी तब्बल ७५.९१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. अनेक भागांत ढगाळ वातावरण आणि पाऊस असूनही मतदारांनी केंद्रांवर मोठी गर्दी केली. भाजपप्रणित एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर काँग्रेस आपले गतवैभव मिळवण्यासाठी मैदानात उतरली आहे.

केंद्रावरच अधिकाऱ्याचा मृत्यू

सोनितपूर जिल्ह्यातील नादुआर विधानसभा मतदारसंघात द्वितीय मतदान अधिकारी म्हणून तैनात असलेले ४५ वर्षीय देबेन होरो गुरुवारी सकाळी आपल्या बिछान्यावर मृतावस्थेत आढळले.

पोलिसांचा हवेत गोळीबार, ७ अटकेत

आसाममध्ये तामुलपूर व शिवसागर येथे झालेल्या हिंसक चकमकींप्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. तामुलपूरमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला, तर शिवसागरमध्ये राजकीय कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तपास सुरू आहे. काही केंद्रांवर रांगेत उभे राहण्यावरून किरकोळ वाद झाले. 

सरमांना हॅट्ट्रिकचा विश्वास

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जालुकबाडी मतदारसंघात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदानापूर्वी त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाजपप्रणित एनडीएला निर्णायक जनादेश मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

‘नव्या आसाम’चा उदय

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांनी जोरहाट येथे मतदान केल्यानंतर ‘नव्या आणि निडर आसाम’च्या उदयाचा नारा दिला. ही निवडणूक लोकशाही अधिकारांच्या रक्षणासाठी निर्णायक असल्याचे सांगत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित केला. 

महत्त्वाची आकडेवारी

९५.५३% - दलगाव    ७२.०५% - न्यू गुवाहाटी८५.२१% - एकूण मतदान

मतदान करण्यापूर्वी आरामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कामाख्या मंदिरासह राज्यातील अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेतले आणि प्रार्थना केली.

८६ टक्क्यांहून अधिक मतदानाची पुद्दुचेरीत नोंद

पुद्दुचेरी: केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये गुरुवारी मतदारांचा ओघ कायम राहिला. येथे ८६ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतरही केंद्रांवर रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाची संधी देण्यात आली. सत्ताधारी एआयएनआरसी आणि विरोधी काँग्रेस यांच्यात येथे मुख्य लढत असून, स्थानिक स्वायत्तता हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरला आहे.

मन्नाडिपेटमध्ये भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत राडा

मन्नाडिपेट मतदारसंघातील तिरुकनूर गावातील मतदान केंद्रावर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. केंद्राबाहेर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले. या वादामुळे मतदानावर परिणाम झाला नाही.

प्रमुख लढती व उमेदवार

मुख्यमंत्री एन. रंगासामी हे थत्तंचवडी व मंगलम अशा दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत. थत्तंचवडीमध्ये त्यांच्यासमोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार व्ही. वैथिलिंगम यांचे मोठे आव्हान आहे. मन्नाडिपेट मतदारसंघात गृहमंत्री ए. नमशिवायम (भाजप) आणि माजी उपाध्यक्ष टी.पी.आर. सेल्वम (काँग्रेस) यांच्यात थेट लढत होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Record Voting in Kerala, Assam, Puducherry Amidst Scattered Violence

Web Summary : Kerala, Assam, and Puducherry witnessed high voter turnout in assembly elections. Clashes and allegations of rigging marred the process. Despite rain and incidents of violence, voters showed enthusiasm, setting record polling percentages.
टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक 2026Kerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६Assamआसाम