ममदापूर : ममदापूर मेळाचा बंधारा बांधण्यासाठी पंधरा दिवसात सचिव समितीची मान्यता मिळणार असल्याची माहिती जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांनी ममदापूर येथील बैठकीत दिली. येथील मेळाचा बंधारा बांधण्यासाठी गेल्या पन्नास वर्षांपासून ग्रामस्थांनी वेळोवेळी उपोषण, घंटानाद, धरणे आंदोलन आदि प्रकाराने प्रशासनाला जागे केले व या बंधार्यासाठी सहा कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला असूनदेखील या कामासाठी सचिव समितीची मजुरीची आवश्यकता आहे. या गोष्टीला सहा महिने उलटूनदेखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे लाभक्षेत्रातील काही ग्रामस्थांसह येवला येथील तहसील कार्यालयासमोर दोन दिवस उपोषणाला बसले होते. त्यामुळे शासन स्तरावर दखल घेऊन बंधारा बांधण्यासाठी लागणारी मान्यता पंधरा दिवसात मिळणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.भागवत सोनवणे यांनी केलेलं उपोषण यशस्वी झाल्याबद्दल ममदापूर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी सरपंच गंगूबाई ठाकरे, उपसरपंच रावसाहेब काळे, विलास गुडघे, हिरामण सदगीर, संजय म्हस्के, पुंजाबा वैद्य, अरुण साबळे, राजू गुडघे, प्रसाद जाधव, निवृत्ती मुडे, मच्िंछद्र साबळे, पोपट ठाकरे, ज्ञानेश काळे, विजय गुडघे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सूत्रसंचलन गोरख वैद्य यांनी केले.
मेळाचा बंधार्यासाठी लवकरच मान्यता
By admin | Updated: January 22, 2016 22:58 IST