शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : '...तर एक कोरोना बाधित व्यक्ती 30 दिवसांत 406 जणांना करू शकतो संक्रमित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 18:36 IST

देशात आतापर्यंत 4,421 जमांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सोमवारपासून ते आतापर्यंत 354 नव्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 326 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत 4,421 जमांना कोरोनाचा संसर्ग2,500 डब्ब्यांमध्ये तयार करण्यात आले आहेत 40 हजार आयसोलेशन बेडदेशात आतापर्यंत 1,07,006 जणांची करण्यात आली कोरोना टेस्ट

नवी दिल्‍ली : लॉकडाऊन अथवा सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही, तर एक कोरोना बाधित व्यक्ती 30 दिवसांत 406 जणांना कोरोना बाधित करतो, असे आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आले आहे. मात्र,  आपण लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन केले तर एक व्यक्ती केवळ 2.5 लोकांनाच संक्रमित करू शकतो, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनसंदर्भात आरोग्य आणि गृह मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

देशात आतापर्यंत 4,421 जमांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सोमवारपासून ते आतापर्यंत 354 नव्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 326 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच अद्याप लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे  कसल्याही प्रकारचे अंदाज बांधू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

2,500 डब्ब्यांमध्ये 40 हजार आयसोलेशन बेड - 

अग्रवाल म्हमणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने 2,500 डब्ब्यांमध्ये तब्बल 40,000 आयसोलेशन बेड तयार केले आहेत. ते रोज 375 आयसोलेशन बेड तयार करत आहेत. देशातील 133 ठिकाणी हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार समूह नियंत्रण आणि प्रशासनास उत्तरदाई आहे.  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका विशेष रणनीतीवर काम करत आहे. ही रणनीती मुख्यतः आगरा, गौतम बुद्ध नगर, पथानमथिट्टा, भीलवाडा आणि पूर्व दिल्लीमध्ये सकारात्मक सिद्ध होत आहे.

देशात आतापर्यंत 1,07,006 टेस्‍ट -भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) रमन गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाच्या 1,07,006 टेस्‍ट करण्यात आल्या आहेत. सध्या 136 सरकारी प्रयोगशाळांमध्ये काम सुरू आहे. तसेच 59 खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना टेस्टची परवानगी देण्यात आली आहे.

देशातील आवश्यक वस्तू आणि सेवा समाधान कारक -यावेळी बोलताना गृह मंत्रालयाच्या संयुक्‍त सचिव पुण्‍य सलिला श्रीवास्‍तव म्हणाल्या, आवश्यक वस्तू आणि  सेवा समाधानकारक आहेत. गृह मंत्रालयाने आवश्यक वस्तूंची आणि लॉकडाऊनमधील उपायांसंदर्भात सविस्तर समीक्षा केली आहे. तसेच साठेबाजी आणि काजाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारHome Ministryगृह मंत्रालयIndiaभारत