सध्या ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. बंगळूरमध्ये सायबर फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. डिजिटल अरेस्टची धमकी देऊन फसवणूक करणाऱ्यांनी एका ७८ वर्षीय महिलेची अंदाजे ३८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अधिकारी असल्याचे भासवून, चौकशीची धमकी देऊन त्या महिलेला पैसे हस्तांतरित करण्यास फसवले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळूरुच्या इंदिरानगर परिसरात घडली. त्या महिलेला ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. त्यांची कागदपत्रे मनी लाँड्रिंग आणि अश्लील सामग्रीशी संबंधित एका प्रकरणात वापरली जात आहेत.
फोन करणाऱ्याने दावा केला की, मुंबईत त्यांच्या नावाने एक बँक खाते उघडण्यात आले असून, त्या खात्याचा वापर दहशतवाद्यांना पैसे पाठवण्यासाठी केला जात आहे.
फोन करणाऱ्यांनी स्वतःची ओळख राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अधिकारी म्हणून करून दिली. त्यांच्यावर गंभीर तपास सुरू आहे आणि सहकार्य न केल्यास तिला अटक केली जाऊ शकते, असे आरोपींनी सांगितले. तपास पूर्ण होईपर्यंत तिला डिजिटल अटकेत ठेवण्यात येत असल्याची धमकी त्या फसवणूक करणाऱ्यांनी त्या महिलेला दिली.
त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी त्या महिलेला अनेक तास फोनवर आणि व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवर ठेवले. तपास सुरू असल्याने कोणाशीही बोलू नका आणि कॉल कट करू नका, असे त्यांना सांगण्यात आले होते. याच काळात, फसवणूक करणाऱ्यांनी तिची बँक खाती आरबीआयकडून सत्यापित करावी लागतील, असे तिला पटवून दिले.
चौकशीच्या नावाखाली त्या महिलेला त्यांच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले. दबावाखाली आणि भीतीपोटी, त्यांनी आरटीजीएसद्वारे अंदाजे ३८ लाख रुपये हस्तांतरित केले. काही काळानंतरही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, आपली फसवणूक झाल्याचा त्यांना संशय आला.
त्यानंतर पूर्व विभागीय सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस आता फोन करणाऱ्यांची ओळख पटवण्याचा आणि पैशांच्या व्यवहाराचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
डिजिटल अरनेस्टची प्रकरणे वाढली
डिजिटल अरेस्ट ही सायबर फसवणुकीची एक नवीन पद्धत बनली आहे. गेल्या दोन वर्षांपासून यात झपाट्याने वाढ होत आहे. या प्रकारच्या फसवणुकीत, फसवणूक करणारे पोलीस, सीबीआय, एनआयए किंवा इतर सरकारी संस्थांचे अधिकारी असल्याचे भासवून लोकांना धमकावतात. त्यानंतर ते त्यांना चौकशी किंवा पडताळणीच्या नावाखाली तासन्तास फोन किंवा व्हिडीओ कॉलवर ठेवून पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडतात.
Web Summary : Bangalore: A 78-year-old woman lost ₹38 lakhs to cyber fraudsters posing as NIA officials. They used 'digital arrest' threats, coercing her into transferring funds under the guise of an investigation. Police are investigating the crime.
Web Summary : बेंगलुरु: एनआईए अधिकारी बनकर साइबर ठगों ने 78 वर्षीय महिला को 'डिजिटल अरेस्ट' की धमकी देकर 38 लाख रुपये ठग लिए। जांच के नाम पर पैसे ट्रांसफर करवाए। पुलिस मामले की जांच कर रही है।