शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! मध्य प्रदेशचा नवरदेव अन् रशियाची नवरी; एका अनोख्या लग्नाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 09:10 IST

Leena Barcolsev And Rishi Verma : रशियातील मुलगी एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आणि आता भारताची सून झाली आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये समोर आली आहे. रशियातील मुलगी एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आणि आता भारताची सून झाली आहे. या रशियन मुलीचं नाव आहे लीना बारकोलसेव्ह (Leena Barcolsev) आणि मुलाचं नाव आहे ऋषी वर्मा (Rishi Verma). दोघांनी नुकतंच कोर्ट मॅरेज केलं आहे. पीटर्सबर्गमध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर हळूहळू ओळख वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ऋषीने व्हि़डीओ कॉलवर तिला प्रपोज केलं होतं. सध्या मध्य प्रदेशमधील या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदूरच्या सप्तश्रृंगी नगरमध्ये राहणारा ऋषी वर्मा हैदराबादमध्ये शेफ म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये युरोप दौऱ्यावर (Europe Trip) गेला असताना ऋषीनं रशियात सेंट पीटर्सबर्गला भेट दिली. इथल्या प्रेक्षणीय स्थळाचे फोटो काढत असताना त्याची भेट लीना बारकोलसेव्होशी झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. ऋषीने लीनाला काही फोटो क्लिक करायला सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर ऋषी काही दिवसांनी भारतात परत आला; मात्र दोघांचा संपर्क तुटला नाही. दोघेही फोनवर बोलू लागले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 

24 फेब्रुवारी रोजी कोर्ट मॅरेज केलं

काही काळाने ऋषीने व्हिडीओ कॉलवरच लीनाला प्रपोज केलं. लीनानेही त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि त्याला होकार दिला. कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे दोघेही बराच काळ एकमेकांना भेटू शकले नाहीत. अखेर डिसेंबर 2021मध्ये व्हिसा मिळाल्यानंतर लीना इंदूरला आली. ती भारतात आल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कोर्ट मॅरेजसाठी अर्ज केला. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी नोंदणी पद्धतीने दोघांनी लग्न केलं. आता डिसेंबरमध्ये ते पुन्हा हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. 

लीना सध्या हिंदी भाषा शिकतेय 

या वर्षाखेरीस आपण हिंदू रितीरिवाजानुसार विवाह करणार असल्याचं या दोघांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. लीनाने तिला भारतीय खाद्यपदार्थ आणि भारतीय संस्कृतीही खूप आवडत असल्याचं सांगितलं. स्वतः शेफ असल्यानं ऋषी लीनाला विविध प्रकारचे भारतीय खाद्यपदार्थ खायला देतो. लीना देखील आता हळूहळू भारतीय पदार्थ बनवण्यास शिकली आहे. दोघंही मंदिरात जातात. लीना सध्या हिंदी भाषा शिकत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेशrussiaरशिया