अहमदाबाद : देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला येत असलेले सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याच हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन व्हावे, यासाठी गुजरात सरकार कामाला लागले आहे.गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौºयावर गेले होते. तेव्हा टेक्सास येथे ह्यहाउडी मोदीह्ण हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच धर्तीवर ह्यहाउडी ट्रम्पह्ण हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. जगातील या दोन बड्या नेत्यांच्या हस्ते या स्टेडियमच्या उद्घाटनाचा प्रस्ताव आहे.या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाख दहा हजार इतकी आहे. या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी ट्रम्प हे अहमदाबाद येथून सरळ हेलिकॉप्टरने स्टेडियमवर येतील. उद्घाटनासाठी येणाºया लोकांसाठी २ किमीच्या आत १७ पार्किंग प्लॉट तयार करण्यात आले आहेत.या प्लॉटमध्ये एक हजार बसेस आणि १० हजार चारचाकी उभ्या राहतील. व्हीव्हीआयपींसाठी विशेष ४ पार्किंग प्लॉट असतील. ही सर्व कामे जोरात सुरू आहेत.प्रचंड सुरक्षा२४-२५ फेब्रुवारी रोजी या स्टेडियमचे उद्घाटन होईल, अशी आशा केली जात आहे. या कार्यक्रमासाठी अहमदाबाद महानगरपालिकेला खास जबाबदारी देण्यात आली आहे. दोन बड्या नेत्यांमुळे परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था असेल.
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 02:43 IST