शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोना संकटात देशानं साद दिल्यास प्रतिसाद द्याल का?; राजन यांचं 'भारतीय' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 10:34 IST

Coronavirus रघुराम राजन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार समितीत निवड

नवी दिल्ली: जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून भारतातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. आधीच अर्थव्यवस्था मंदीसदृश्य स्थितीत असताना आता देशासमोर कोरोनामुळे नवं संकट निर्माण झालं आहे. जगातही कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि शिकागो विद्यापीठाचे प्राध्यापक रघुराम राजन यांचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सापडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतील. यानंतर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि कोरोनाच्या संकटावर भाष्य केलं.भारतात कोरोनाच्या संकटाची तीव्रता वाढत असून अर्थव्यवस्थाही अडचणीत आहे. अशा परिस्थितीवर भारताची मदत कराल का, असा प्रश्न राजन यांना विचारण्यात आला. त्यावर मदतीचं आवाहन केल्यास मी नक्कीच योगदान देईन, असं उत्तर त्यांनी दिलं. ही परिस्थिती बिकट आहे. मी एक भारतीय नागरिक आहे. कोणत्याही भारतीयाला कठीण काळात मदतीसाठी बोलावलं जातं, तेव्हा तो येणारच, असं राजन पुढे म्हणाले.कोरोना, त्याचा जागतिक आणि आर्थिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर राजन यांनी भाष्य केलं. 'आर्थिक अर्थव्यवस्थेला मंदीचं ग्रहण लागलं आहे. मात्र पुढील वर्षी ही स्थिती सुधारेल. भारतासमोर परकीय चलनातील देवाणघेवाणीचं मोठं आव्हान आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या चलनाची स्थिती चांगली आहे. याचं श्रेय रिझर्व्ह बँकेला जातं आणि यात दुमत असण्याचं कारण नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरलं आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत ही घसरण कमी आहे,' असं राजन म्हणाले. संकटाच्या काळात विरोधकांना आणि तज्ज्ञांना सोबत घेण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केलं. स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं आव्हान देशासमोर आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करायला हवा. केवळ पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं या संकटाचा सामना करणं सोपं असणार नाही. त्यामुळे सरकारनं प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं सहकार्य घ्यायला हवं, असा सल्ला राजन यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक