जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला, यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा समावेश होता. या घटनेनंतर भारतीय नौदलाने आपली ताकद आणि तयारी दाखवून एक कडक संदेश दिला आहे.
भारतीय नौदलाने २६ एप्रिल रोजी त्यांच्या अधिकृत मीडिया हँडल @IndiannavyMedia वर एक फोटो शेअर केला, यामध्ये चार युद्धनौका समुद्रात एकत्र गस्त घालताना दिसत आहेत. पोस्टला "एकतेत ताकद; उद्देशपूर्ण उपस्थिती" असे कॅप्शन देण्यात आले होते आणि त्यासोबत "#MissionReady #AnytimeAnywhereAnyhow" असे कॅप्शन देण्यात आले होते. हा फोटो आणि संदेश भारतीय नौदलाची ताकद आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची त्यांची तयारी स्पष्टपणे दाखवते.
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. यात सिंधू पाणी करार स्थगित, अटारी सीमा चौकी बंद करणे यांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व व्यापारी संबंध तोडले आहेत आणि याला 'युद्धाची कृती' म्हटले आहे. दरम्यान, भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील त्यांच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस सुरत वरून मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, यामुळे त्यांची ऑपरेशनल तयारी दिसून आली.
भारतीय नौदल अडीच पट मोठा
भारतीय नौदला पाकिस्तानपेक्षा सुमारे अडीच पट मोठा आहे. विमानवाहू जहाजांमुळे भारताला समुद्रातून हवाई हल्ला करण्यात मोठे यश मिळते. ही ताकद पाकिस्तानकडे नाही. २०२५ मध्ये भारतीय नौदलाकडे २९३ जहाजे आहेत, यात विमानवाहू जहाजे, पाणबुड्या, विनाशक, फ्रिगेट्स, कॉर्वेट्स आणि इतर सहाय्यक जहाजांचा समावेश आहे. भारताकडे दोन विमानवाहू जहाजे आहेत - आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत. भारताकडे १६ पारंपारिक पाणबुड्या आणि २ अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या आहेत.
पाकिस्तानची ताकद किती?
पाकिस्तान नौदलाकडे १२१ जहाजे आहेत, जी भारतीय नौदलापेक्षा खूपच कमी आहेत. पाकिस्तानकडे विमानवाहू जहाजे नाहीत, परंतु त्यांच्याकडे ८ पाणबुड्या आहेत, आणि अलीकडेच त्यांनी चीनकडून हेंगशेंग-वर्ग पाणबुड्या खरेदी करण्याचा करार केला आहे. याव्यतिरिक्त, त्यात काही फ्रिगेट्स आणि क्षेपणास्त्र नौका आहेत.