शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

RBI Vs Government: रिझर्व्ह बँकेच्या उच्चपदस्थांची घुसमट चव्हाट्यावर का आली? जाणून घ्या आतली बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 07:14 IST

गुरूमूर्तींचा अनावश्यक हस्तक्षेप; बोर्डावरील नियुक्तीमुळे अधिकारी नाराज

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : रिझर्व बँक व मोदी सरकार यांच्यातील कडवटपणा अखेर चव्हाट्यावर आला. हे सारे को घडले? तणाव कोणत्या कारणांमुळे निर्माण झाला, हे शोधताना वेगळाच घटनाक्रम समोर आला आहे. बँकेच्या कारभारात सरकारने चालविलेल्या हस्तक्षेपामुळे संतापलेले डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी गेल्या शुक्रवारी केलेल्या भाषणातून घुसमट प्रथमच बाहेर आली. आचार्य म्हणाले की, जी सरकारे केंद्रीय बँकांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करीत नाहीत, तिथला आर्थिक बाजार तत्काळ गंभीर संकटात सापडतो. अर्थव्यवस्था पेट घेते व देशातल्या प्रमुख संस्थांची भूमिकाच असहाय अन् पोकळ होऊन जाते.आचार्य यांच्या या भाषणामुळे केंद्र सरकार अस्वस्थ झाले. सरकारची अस्वस्थता अर्थमंत्री अरुण जेटलींकडून व्यक्त झाली. ‘यूपीए सरकार सत्तेवर असताना २00९ ते २0१४ दरम्यान राष्ट्रीकृत बँकांनी अंदाधुंद कर्जे वाटली. त्यावर रिझर्व बँक नियंत्रण ठेवू शकली नाही, हा जेटलींच्या त्यानंतर आलेल्या निवेदनाचा सारांश होता. या वादाचा सुगावा लागताच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला आग्रह केला की, हा संघर्ष लवकरात लवकर संपवा. रिझर्व्ह बँक व सरकार दोघांनी समोरासमोर बसून, चर्चेतून मार्ग काढला पाहिजे.नोटाबंदीचा निर्णय, मुद्रा बँक संकल्पना यांच्याच सल्ल्याने बँकेच्या बोर्डावर रा.स्व. संघाच्या स्वदेशी जागरण मंचाचे सहसंयोजक गुरुमूर्तींची नियुक्ती बँकेच्या उच्चपदस्थांना अजिबात रुचलेली नाही. तथापि, या नियुक्तीला जाहीरपणे विरोध झाला नाही. नोव्हेंबर २0१६ मध्ये नोटाबंदीचा जो वादग्रस्त निर्णय मोदी सरकारने घेतला, त्यामागे गुरुमूर्तीची भूमिका कारणीभूत होती.मुद्रा बँकेची संकल्पनाही गुरुमूर्तींच्याच सल्ल्यानुसारच पंतप्रधानांनी सुरू केल्याचे मानले जाते. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या विरोधात गुरुमूर्ती कडवट टीका करीत आले आहेत. भारतासाठी विचार करणे बँकेने सोडून दिले आहे, असे गुरुमूर्ती मध्यंतरी म्हणाले होते.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार