शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

RBI कडून 500 च्या दोन वेगवेगळ्या नोटांची छपाई ? दशकातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा काँग्रेसचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:12 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 500 रुपयांच्या दोन वेगवेगळ्या नोटांची छपाई केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे

ठळक मुद्देरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 500 रुपयांच्या दोन वेगवेगळ्या नोटांची छपाई केली जात असल्याचा काँग्रेसचा आरोपकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेतअरुण जेटली यांनी या नोटांची सत्यता तपासली जाईल असं सांगितलं आहे

नवी दिल्ली, दि. 8 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 500 रुपयांच्या दोन वेगवेगळ्या नोटांची छपाई केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. काँग्रेसने राज्यसभेत 500 च्या दोन वेगवेगळ्या नोटा दाखवत, या नोटांचा आकार आणि डिझाईन वेगवेगळं असल्याचा दावा करत हा या दशकातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. 

'केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय का घेतला हे आज आम्हाला कळलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन वेगवेगळ्या नोटांची छपाई केली आहे. या नोटांचा आकार आणि डिझाईन वेगवेगळे आहेत. हे कसं काय शक्य आहे ?', असा सवाल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. कपिल सिब्बल यांनी यावेळी दोन नोटा असलेला एक फलकही हाती घेतला होता.

'आम्ही कधीच दोन वेगवेगळ्या एक पक्षासाठी आणि एक सरकारसाठी अशा नोटा छापलेल्या नाहीत. बाजारात 500 आणि 2000 च्या दोन वेगवेगळ्या नोटा आहेत', असा आरोप गुलाम नबी आजाद यांनीही केला आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्व आरोप फेटाळून लावत काँग्रेस बेजबाबदार वक्तव्य करत सभागृहात गांभीर्य नसणारे विषय उपस्थित करत असल्याचं म्हटलं आहे. 'नोटांबाबत बेजबाबदार वक्तव्य केलं जात आहे. शून्य प्रहरचा गैरवापर केला जात आहे', असं अरुण जेटली बोलले आहेत. 

तृणमूल काँग्रेसचे सदस्य डेरेक ओब्रिएन यांनी काँग्रेला पाठिंबा दिला आहे. 'नोटांकडे पाहा, कपिल सिब्बल यांनी अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे', असं डेरेक ओब्रिएन बोलले आहेत. जनता दलाचे नेता शरद यादव आणि समाजवादी पक्षाचे नेता नरेश अग्रवाल यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी या नोटांचा स्त्रोत जाहीर करावा अशी मागणी केली आहे. 

अरुण जेटली यांनी या नोटांची सत्यता तपासली जाईल असं सांगितलं आहे. अर्थमंत्रालयाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोटांच्या आकार आणि डिझाईनमध्ये थोडा फरक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सरकारने दोन वेगवेगळ्या नोटांची छपाई करण्याचा कोणताच आदेश दिलेला नाही असंही स्पष्ट केलं आहे.