शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

RBI On Currency Notes: नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 4:39 PM

RBI On Currency Notes: अर्थ मंत्रालय आणि RBI रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांचे फोटो नोटांवर लावणार असल्याच्या बातम्या काही मीडियामध्ये आल्या होत्या.

RBI On Mahatma Gandhi: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने सध्याच्या चलनात असलेल्या नोटांवरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा फोटो काढून टाकल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. आरबीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'आरबीआय सध्याच्या चलनात असलेल्या नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो बदलून इतर काही लोकांच्या फोटोसह नवीन नोटा छापण्याची तयारी करत आहे, अशी चुकीची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत आहे.' आरबीआयच्या म्हणण्यानुसार असा कोणताही प्रस्ताव आरबीआयसमोर नाही.

आरबीआयने दिला नकार काही माध्यमांमध्ये असे वृत्त आले होते की, वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक नवीन सीरीज नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांचा फोटो छापण्याचा विचार करत आहेत. या वृत्ताचे खंडन करण्यासाठी आरबीआयला पुढे यावे लागले. आरबीआयने ट्विट करून एक प्रेस रिलीझ जारी केले आणि स्पष्ट केले की सध्याच्या चलन आणि नोटांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत.

अफवेवर आरबीआयचे स्पष्टीकरण मीडियातून एक वृत्त आले होते की, अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या आरबीआय आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांचे वॉटरमार्क सेट आयआयटी दिल्लीतील प्रोफेसर दिलीप टी साहनी यांना पाठवून त्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आहे. त्यानंतर हा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला जाईल. त्यावर सरकार अंतिम निर्णय घेईल. पण, आता आरबीआयने स्पष्टपणे या अफवांचे खंडन केले आहे.

टॅग्स :Indian Currencyभारतीय चलनMahatma Gandhiमहात्मा गांधीRavindranath Tagoreरवींद्रनाथ टागोरAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलामReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक