नोटाबंदीचा प्रभाव क्षणिक, ऊर्जित पटेलांचं संसदीय समितीसमोर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 04:21 PM2018-11-27T16:21:39+5:302018-11-27T16:23:14+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आज संसदीयं समितीसमोर हजर झाले आहेत.

rbi governor urjit patel breifs standing committee on in parliament on notes ban | नोटाबंदीचा प्रभाव क्षणिक, ऊर्जित पटेलांचं संसदीय समितीसमोर स्पष्टीकरण

नोटाबंदीचा प्रभाव क्षणिक, ऊर्जित पटेलांचं संसदीय समितीसमोर स्पष्टीकरण

Next

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आज संसदीयं समितीसमोर हजर झाले आहेत. नोटाबंदी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका कर्जात अडकल्यानं नॉन परफॉर्मिंग एसेट(एनपीए)सह विविध मुद्द्यांवर माहिती दिली आहे. पहिल्यांदा 12 नोव्हेंबर रोजी समितीसमोर हजर व्हायचं होतं. परंतु ती तारीख पुढे ढकलण्यात आली होती. यावेळी ऊर्जित पटेल यांनी नोटाबंदीचा प्रभाव हा क्षणिक होता, असं म्हटलं आहे.

संसदीय समितीच्या या बैठकीत 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करणे, आरबीआयमध्ये विविध सुधारणा, कर्जाच्या जाळ्यात अडकलेली बँकिंग सिस्टीम आणि अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या कमिटीचे सदस्य आहेत. तर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. विरप्पा मोइली या समितीचे अध्यक्ष आहेत. 

Web Title: rbi governor urjit patel breifs standing committee on in parliament on notes ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.