शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण : राज्य सरकारच्या अर्जाला गृहमंत्रालयाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 11:19 IST

राज्य सरकारचा अर्ज अस्पष्ट व असमर्थनीय आहे, असे गृह मंत्रालयाने दंडाधिकारी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी केंद्र सरकारला काही महत्त्वाची कागदपत्रे देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या राज्य सरकारच्या अर्जावर केंद्रीय गृहमंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारचा अर्ज अस्पष्ट व असमर्थनीय आहे, असे गृह मंत्रालयाने दंडाधिकारी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.काही महत्त्वाच्या लोकांचे फोन टॅप करून काही गोपनीय माहिती उघड केल्याबद्दल राज्य गुप्तचर विभागाने बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना फोन टॅपिंगची घटना घडली. रश्मी शुक्ला यांनी परवानगी न घेताच फोन टॅप केल्याचा आरोप सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने केला आहे.ही गुप्त माहिती असलेला एक पेन ड्राईव्ह व काही कागदपत्रे केंद्र सरकारकडे जमा करण्यात आल्याचे राज्य सरकारने अर्जात म्हटले आहे. त्यामुळे तो पेन ड्राईव्ह व राज्य सरकारकडे  असलेले पेन ड्राईव्ह सारखेच आहेत का? याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला. मात्र, केंद्र सरकारने त्यावर उत्तर न दिल्याने राज्य सरकारने दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला.या अर्जावर गृहमंत्रालयाने आक्षेप घेतला. राज्य सरकारला नक्की कोणती कागदपत्रे हवी आहे आणि ती कोणाकडून हवी आहेत, याबाबत अर्जात स्पष्टता नाही. तसेच सरकारचा अर्ज असमर्थनीय आहे. त्यामुळे तो फेटाळावा, अशी विनंती गृहमंत्रालयाने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला केली आहे. या अर्जावर १८ डिसेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी